गुहागर : गुहागर शहरातील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक असलेले ईश्वर हलगरे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या बहुचर्चित ‘आरसा’ कादंबरीला लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. सदर पुरस्काराचे वितरण लातूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
Ishwar Halgare, a teacher in a primary school in Guhagar, recently published his much-discussed novel ‘Arsa’. Babasaheb Ambedkar Sahitya Akademi Award has been announced. The award will be distributed in the presence of dignitaries at Latur.
डान्सबार व त्या अनुषंगाने येणारे अधोविश्व ‘आरसा’ कादंबरीचे मध्यवर्ती सूत्र आहे. मराठवाडा आणि मुंबई यांतील आर्थिक विषमताही कादंबरीतून चित्रीत झालेली आहे. अशा वेगळ्या विषयामुळे सध्या मराठी साहित्यात ही कादंबरी चर्चेचा विषय ठरत आहे.
पेशाने शिक्षक असलेले हलगरे गेली तेरा वर्षापासून गुहागर तालुक्यात कार्यरत आहेत. दरम्यान येथील साहित्य चळवळीशी ते कायम जोडले गेलेले आहेत. विभागीय साहित्य संमेलन व जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखेचे ते कार्यवाह आहेत.
या पुरस्कारानिमित्त हलगरे यांचे मसाप गुहागरचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब राशिनकर, कार्याध्यक्षा प्रा. मनाली बावधनकर, ज्ञानेश्वर झगडे, सुधाकर कांबळे, विवेकानंद जोशी, ग्रंथपाल सोनाली घाडे, गुहागरचे गटशिक्षणाधिकारी जगदाळे, विस्ताराधिकारी श्रीमती देसाई, केंद्रप्रमुख लोहकरे, जीवन शिक्षण शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व सहकारी शिक्षक वृंद, तसेच तालुक्यातील तमाम शिक्षक बांधवांनी अभिनंदन केले आहे.