रत्नागिरी : माऊली प्रासादिक रत्नागिरी जिल्हा भजन मंडळातर्फे जिल्ह्यातील ज्येष्ठ भजनी कलाकारांचा सन्मान ८ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त भजनसम्राट बुवा रामदास कासले (मुंबई) व भजनसम्राट आणि मंडळाचे जिल्हाध्यक्ष बुवा नारायण मिरजुळकर (रत्नागिरी) यांची भजनाची डबलबारी, जुगलबंदी रंगणार आहे. यामुळे भजनप्रेमींना बऱ्याच दिवसांनी रागदारी गायन ऐकण्याची संधी लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे निवेदन नाट्यकलावंत रामचंद्र आंबेरकर करणार आहेत. रत्नागिरी जिल्हा भजन मंडळाने वर्षभरात कोरोना जनजागृती, गीतगायन, समाजप्रबोधन कोकण विभागीय स्पर्धा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कदम, पांचाळ, पाटील या भजनमहर्षीच्या तीन पंथातील तीन बुवांचा तिरंगी भजनाचा सामना आदी कार्यक्रम राबवले. मंडळ भजनी कलाकारांना प्रोत्साहन देत आहे.
जिल्हा भजन मंडळाचे अध्यक्ष कोकणरत्न नारायण मिरजुळकर, उपाध्यक्ष सुदेश नागवेकर, खजिनदार विजय मयेकर, सचिव संतोष आरावकर यांच्यासमवेत कार्यकारिणी मेहनत घेत आहे. डबलबारीच्या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी जास्तीत जास्त भजनप्रेमींनी उपस्थित राहावे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी बुवा विठोबा (बावा) नागवेकर, रोशन ढवण, अनिकेत शिंदे, अभिजीत सडकर, सचिन आढाव, मिलींद आरेकर यांच्याशी संपर्क साधावा.