• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोरोना संपला या भ्रमात राहू नका

by Ganesh Dhanawade
July 10, 2021
in Bharat
16 1
0
कोरोना संपला या भ्रमात राहू नका
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

WHO च्या मुख्य शास्त्रज्ञांचा इशारा

दिल्ली : कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. त्यामुळे प्रत्येक देश कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक देशांनी कोरोना लसीकरणावर जोर दिला आहे. त्यात अनेक देशांनी कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसताच नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कोरोना संपला नाही, त्याचा वेगही कमी झालेला नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं आहे. त्यामुळे यापुढे काळजी घेणं गरजेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मागच्या दोन आठवड्यात आफ्रिकेतील मृत्यूदर ३०-४० टक्क्यांनी वाढला आहे. “मागच्या २४ तासात ५ लाख नविन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ९,३०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही काय कोरोना कमी होण्याची लक्षणं नाहीत”, असं सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं. डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक घातक विषाणू आहे. या व्हायरसची लागण झालेला व्यक्ती ८ जणांना संक्रमित करतो. तेच प्रमाण कोरोनाच्या इतर व्हायरसमध्ये ३ इतकं आहे. त्यामुळे डेल्टा व्हायरस किती घातक आहे? याचा अंदाज येतो, असंही त्यांनी सांगितलं.

कोरोना पसरण्याची चार प्रमुख कारणं

कोरोनाचा नवा डेल्टा व्हेरिएंट व्हायरस वेगाने पसरत आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तील संक्रमित करण्याचा वेग अधिक आहे. लॉकडाउन आणि नियम शिथिल केल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

बाजारात, कार्यक्रमात लोकांची गर्दी वाढल्याने कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे.

कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून घरातच असणाऱ्या लोकांना मानसिक थकवा जाणवत आहे. त्यामुळे ते सक्तीने बाहेर पडत समाजामध्ये मिसळत आहेत. मात्र संपर्क वाढल्याने कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. त्यात अनेक देशांनी कोरोनावरील निर्बंध शिथिल केले आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं बंधनकारण नसल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर लसीकरणाचा वेग मंदावला आहे. अनेक देशात लसींचा तुटवडा जाणवत आहे. तसेच आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने मृत्यूदर वाढला आहे.

कोव्हॅक्सिन कोरोनावर प्रभावशाली असल्याचं देखील सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं. या लसीचा प्रभाव चांगला दिसत आहे. कोव्हॅक्सिनच्या ३ टप्प्यातील अहवालाचा अभ्यास सुरु आहे. ऑगस्टच्या मध्यापर्यंत कोव्हॅक्सिनला जागतिक परवानगी मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.

Tags: CoronaCorona NewsCovid19GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकोरोनाकोरोना बातम्याकोविड केअर सेंटरकोव्हॅक्सिनजागतिक आरोग्य संघटनाटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामुख्य शास्त्रज्ञमुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथनलसीकरणलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.