गुहागर : कास्ट्राईब शिक्षक संघटना(CastribeTeachers Association) महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागर(Maharashtra State Taluka Branch Guhagar) यांच्या वतीने स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती(Krantijyoti), ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले(Gyanjyoti Savitribai Phule) यांच्या जयंती निमित्ताने रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या(Ratnagiri Zilla Parishad) सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना जिल्हा निधीला(Savitribai Phule Adoption Parent Scheme District Fund) रुपये 3000 ची देणगी(Donation) देऊन संघटनेच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तालुका शाखा गुहागरचे अध्यक्ष सुहास गायकवाड यांनी जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नंबर 3 माटलवाडी तालुका गुहागर या शाळेतील एका विद्यार्थिनीसाठी दत्तक पालक योजने(Adoptive parents Plan) मध्ये जिल्हा परिषद फंडासाठी तीन हजार रुपयाची देणगी देऊन सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी जे आयुष्यभर कार्य केले त्या प्रती कृतज्ञता(Gratitude) म्हणून सदर देणगी देऊन कास्ट्राईब शिक्षक संघटना(CastribeTeachers Association) ही नेहमीच महापुरुषांच्या विचारधारेवर कार्य करत असल्याचे दाखवून दिले.
जिजाऊ(Jijau) ते सावित्री(Savitri) या शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अभियान अंतर्गत तालुका स्तरावर इयत्ता १ ते ५ व इयत्ता ६ ते ८ साठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले(Krantijyoti Savitribai Phule) राष्ट्रमाता जिजाऊ(Mother of the Nation Jijau) यांच्या जीवनावर निबंध स्पर्धेचे(Essay Competition) आयोजन करण्यात आलेले आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल शिक्षण विभाग पंचायत समिती गुहागर(Education Department Panchayat Samiti Guhagar) व कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी अध्यक्ष(Castrib Teachers Association District Ratnagiri President) ,सचिव व पदाधिकारी यांनी यांनी कौतुक केले आहे.