गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी कोरोना काळात बजावलेल्या कामगिरीबद्दल गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मानपत्र देऊन कोव्हिड योध्दा म्हणून गौरव करण्यात आला.
On the occasion of the birthday of Maharashtra Navnirman Sena President Raj Thakare, Guhagar taluka Maharashtra Navnirman Sena honored the doctors and health workers of Chikhali Primary Health Center for their performance during the Corona period.
गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे कोरोना संदर्भातील शासनाचे सर्व नियम व अटीचे पालन करून सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला वाडकर, मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, माजी अध्यक्ष राजेश शेटे, महिला अध्यक्ष सानिया ठाकूर, महिला विभाग अध्यक्ष व तळवली ग्रामपंचायत सरपंच मयुरी शिगवण, जाणवले ग्रामपंचायतीच्या सदस्या वैभवी जानवळकर, तेजस पोकळे, संजय भुवड, गंगाराम खांबे, दिनेश निवाते, रुपेश घवाले आदी कार्यकर्त्यांसह सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला वाडकर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आरोग्य कर्मचारी आरोग्य सेवक विजय जानवलकर, कमलेश लाकडे, आरोग्य पर्यवेक्षक समीर पुरोहित, मनोज सकपाळ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजित पाटील, आरोग्यसेविका शितल किल्लेकर, वाहन चालक सचिन शिर्के, सफाई कर्मचारी संतोष शिगवण, डाटा ऑपरेटर अजय कणगे, बेंद्रे, आरोग्य सेवक व्ही. वाय. विलणकर, एस. एस. अलीम, आरोग्यसेविका पी. ई.कदम, एन. यू. शिंणगे, के.ए.जाधव, पी. एस. पपुलवार, आशा गट प्रवर्तक सुरभी भोसले, नेहा वराडकर यांचाहि कोव्हिड योध्दा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. शाशिकला वाडकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर, तसेच शारिरीक अंतर ठेवणे गरजेचे आहे. आपण स्वतःची काळजी घेतली तर कोरोनावर मात करू शकतो. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह रेट सतत वाढत आहे. त्यासाठी सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याच्या त्या म्हणाल्या.
गुहागर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचाही मनसेच्या वतीने कोवीड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. बळवंत यांनी मनसे कार्यकर्त्यांचे कौतुक करून पहिल्यांदाच आपणाकडून सन्मान होत असल्याचे सांगून आम्ही सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी चांगल्या प्रकारे कोविड रूग्णांची सेवा करत असल्याचे सांगितले. त्यानंतर मनसेच्या वतीने चिखली येथील श्री काडसिध्देश्वर मठात जाऊन राजसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली.