गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीच्या वतीने कंपनीतील वेलनेस सेंटर व प्रकल्प ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी कोरोना काळात चांगली कामगिरी करून कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच कंपनीतील अधिकारी, कामगार यांची कोरोना चाचणी, लसीकरण उत्तम प्रकारे केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आरजीपीपीएल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंता यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीतील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना कोरफड रोपटे भेट देऊन कोविड योध्दा म्हणून सन्मान केला.
On behalf of Ratnagiri Gas and Power Company at Anjanvel, doctors and health workers working at the company’s wellness center and project site made a special effort to control the corona outbreak by performing well during the corona period. He honored the doctors and health workers of the company as Covid warriors by visiting aloe vera plants.
सदरील कार्यक्रम कोरोनाचे नियम व अटी पाळून वेलनेस सेंटर, आरजीपीपीएल येथे पार पडला. या कार्यक्रमाला कंपनीचे जनरल मॅनेजर हरबंस सिंग बावा, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. युवराज इंजे, डॉ. रिशू रंजन, मानव संसाधन व्यवस्थापक अमित शर्मा, गुंजन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. कंपनीने कोवीड योध्दा सन्मान केलेल्या मध्ये डॉ. युवराज इंजे, डॉ. मनोज चौहान, डॉ.अतुल गावड, डॉ. रिशु रंजन, डॉ. धामणस्कर, सुपरवायझर भक्ती भोसले, कार्यालय सहाय्यक स्नेहल पावसकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजित शिंगाडे, दिपाली पांचाळ, अधिपरीचारिका शर्ली कनगुटकर, अंकिता वराडकर, संपदा जगदाळे, परिचारिका तृप्ती बागकर, साक्षी मोहिते, रसिका धाडवे, स्वरा सातार्डेकर, दीपक मुके, मनीषा गुहागरकर, सुरेंद्र जाधव, संतोष आरेकर, शैलेश मोरे, हृषिकेश पावसकर, मनोज सांडीम, अमित देवकर, ऊर्मिला तोडणकर, अलका गमरे, प्रतिभा सैतवडेकर, उज्वला जाधव, वाहनचालक महेंद्र कदम, प्रणव देवकर आदींना कोरफड रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जनरल मॅनेजर हरबंस सिंग बावा यांनी सांगितले की, कोवीड काळात कंपनीतील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होणे क्रमप्राप्त असून त्यांनी अशीच पुढील काळात आरोग्य सेवा पुरवावी, असे ते म्हणाले.