गुहागर : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ रत्नागिरी जिल्हा कार्यकारणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता संदीप नाचणकर यांचे मंथन रिजंन्सी लाॕज सभागृह, एम.आय.डी.सी.आॕक्टेल कंपनी समोर ही सभा होणार आहे.


A meeting of all office bearers of Ratnagiri District Teli Social Service Association Ratnagiri District Executive has been organized. The meeting will be held on Sunday 24th October at 11.30 am in front of Sandeep Nachankar’s Manthan Regency Lodge Hall, MIDC Airtel Company.


सभेमध्ये प्रत्येक तालुक्यातील तेली समाजाच्या सद्यस्थितीचा व कार्याचा आढावा घेणे,रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे रत्नागिरी तालुक्यात शहराच्या ठीकाणी समाजाला उपयुक्त ठरेल असे कायम स्वरूपी भाड्याने कार्यालय सुरू करण्यासंबधी चर्चा करणे व निर्णय घेणे,रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाची नवीन वर्षांची दिनदर्शिका प्रकाशित करण्याविषयी चर्चा करणे, दर दोन वर्षांनी संप्पन्न होणाऱ्या वधुवर पालक परिचय मेळावा आयोजनाविषयी चर्चा करणे तसेच आयत्या वेळच्या विषय आदी विषयांवर सभेत विचार विनिमय करण्यात येणार आहे. तरी सभेला जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष रघुवीर शेलार,सचिव संदीप पवार यांनी रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाच्या वतीने केले आहे.

