गुहागर : चिपळूण शहरांमध्ये आलेल्या पूरस्थितीची दखल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सचिव न्यायाधीश श्री. सामंत यांनी घेतली असून त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक सहकार्य करणाऱ्या संस्थांना मदतीसाठी आवाहन केले आहे.
Notice the precedent in the Chiplun cities District Legal Services Authority and Secretary Judge Shri. Taken by Samantha He has appealed to various social co-operative organizations in the district for help
या आवाहनाप्रमाणे चिपळूण न्यायालयाचे न्यायाधीश मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र महाराज चारीटेबल ट्रस्ट यांनी दिलेल्या अन्नधान्याच्या किटचे योग्य पद्धतीने नियोजन करून गरजू लोकांना वाटप करण्यात आले. यावेळी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश श्री. मोमीन, तालुका न्यायाधीश श्रीमती पावसकर, श्रीमती माने, श्री नरेंद्र महाराज देवस्थानचे संचालक वायभासे, धर्मादाय विभागाचे कमिशनर श्री. ठसाळे, कायदा साथी अलंकार विखारे, जिल्हा विधी सेवा समितीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.