भूमी पॉट्री अँड क्ले स्टेशन : हस्तकलेला आधुनिकतेची जोड
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील धोपावे येथील रसिका दळींना 2019 चा जिल्हा उद्योजक पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार प्रजासत्ताक दिन 2022 ला जिल्हा उद्योग केंद्र येथे देण्यात आला. कर्नाटकातील मातीपासून 60 पेक्षा अधिक गृहोपयोगी आणि शोभेच्या वस्तू त्या तयार करतात. त्यांची उत्पादने निर्यात होतात. तसेच या उद्योगातून सौ. रसिका दळींनी 40 स्थानिक महिलांना रोजगार दिला आहे. Bhumi Pottery and Clay Station
धोपावे येथील रसिका दळींनी भूमी पॉट्री अँड क्ले स्टेशन या उद्योगाची सुरवात 2017 मध्ये केली. तत्पूर्वी हस्तकलेला आधुनिकतेची जोड देवून त्यांनी फोल्डींग गुढी हे उत्पादन सुरु केले. केवळ उत्पादन न करता महाराष्ट्रातील प्रतिथयश सिनेकलाकार, उद्योजक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना भेट म्हणून गुढी दिल्या. मार्केटींगच्या (Marketing) या नव्या तंत्रामुळे रसिका दळींनी तयार केलेली फोल्डींग गुढीला शहरी भागाबरोबरच विदेशातून मागणी आली. सौ. दळींची वेगळी कल्पना लोकप्रिय झाली. गुढी बरोबर दिवाळीमध्ये मातीच्या पणत्या आकर्षक पध्दतीने सजवून त्या सोबत अन्य वस्तूंचा गीफ्टसेटचे उत्पादनही त्यांनी सुरु केले. बिग बझारने (Big Bazar) 6 लाख रुपयांच्या पणत्यांची खरेदी केली. रक्षाबंधनासाठी मातीपासून आकर्षक राख्या बनवल्या. अशा विविध प्रयोगातून पुढे भूमी पॉट्री अँड क्ले स्टेशन या उद्योगाची पायाभरणी झाली. Bhumi Pottery and Clay Station
मातीच्या उत्पादनांना वाढणाऱ्या मागणीतून मातीपासून बनविलेल्या उत्पादनांचा विचार सुरु झाला. मोठ्या प्रमाणात वस्तू बनवण्यासाठी तंत्रज्ञानही आवश्यक होते. बेळगाव, दिल्ली, वाराणसी (उत्तरप्रदेश) अशा ठिकाणी शोध सुरु झाला. सुरुवातीला मातीच्या भांड्यासाठी आवश्यक असणारे प्रायमरी मोल्ड दिल्लीतून आणले. उत्तरप्रदेशातून माती आली. पुढे उत्पादनाची व्याप्ती वाढु लागल्यावर दिल्लीतून 15-15 माणसे धोपाव्यात राहीली. त्यांच्याकडून 50 उत्पादनांचे 5000 मोल्ड तयार करुन घेण्यात आले. भांडी भाजण्यासाठी मोठी इलेक्ट्रीक भट्टी आणली. मातीला आकार देण्यासाठी वीजेवर चालणारे रोटर बसविले. Bhumi Pottery and Clay Station
तांब्याभांडे, माठ, पाण्याची बाटली या वस्तू प्रमाणेच थेट गॅसवर स्वयंपाक करता येईल अशी भांडी, ओव्हनमध्ये वापरता येतील अशी भांडी, चहासाठी एकदाच वापरता येतील असे कुल्लड अशा विविध वस्तू भूमी पॉट्रीमध्ये बनु लागल्या. Bhumi Pottery and Clay Station
आज भूमी पॉट्रीमध्ये 60 पेक्षा अधिक मातीच्या वस्तू बनविल्या जातात. त्यामध्ये हंडीचे विविध प्रकार, दही बाऊल, आकर्षक मडके, कुंड्या, बेल, किटली, परडी, कंदील, धुपारत, ताकासाठी ग्लास, कॉफी मग, कपबशी आदी उत्पादनांचा समावेश आहे. Bhumi Pottery and Clay Station
अनेक पर्यटक धोपाव्यातील युनिटला भेट देतात. हॉटेल व्यावसायिक मातीच्या भांड्यांची मागणी करतात. परदेशातून या भांड्यांना मागणी वाढत आहे. खादी ग्रामोद्योगच्या अधिकाऱ्यांना हा प्रकल्प इतका आवडला की त्यांनी शासकीय खर्चाने या युनिटचे व्हिडिओ शुटींग केले. खादीच्या पोर्टलवर हा व्हिडिओ पहायला मिळतो. खादी ग्रामोद्योगमुळे मंत्रालयात दोन वेळा भूमी पॉट्रीला आपल्या वस्तूंच्या प्रदर्शनासाठी स्टॉल मिळाला. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मुद्दाम धोपाव्यात येवून या प्रकल्पाला भेट दिली आहे. Bhumi Pottery and Clay Station
रत्नागिरीमधील जिल्हा उद्योग केंद्राने 2019 मध्ये सौ. रसिका दळींना जिल्हा उद्योजक पुरस्कार जाहीर केला होता. मात्र कोरोना महामारीमुळे या पुरस्काराचे वितरण झाले नव्हते. यावर्षी म्हणजेच 26 जानेवारी 2022 ला जिल्हा उद्योग केंद्राने हा पुरस्कार सौ. रसिका दळींना सन्मानपूर्वक दिला.