गुहागर तालुका भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची मागणी
गुहागर : मागील दोन वर्षापासुन रखडलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची मतदार यादी नव्याने करण्यात यावी तर महाराष्ट्र शासनाने नाविन्यपूर्ण सहकारी संस्था या मोहिमेतील नव्याने निर्माण होऊन दोन वर्षे पूर्ण झालेल्या सहकारी संस्थांना या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळावा, अशी मागणी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि कल्पवृक्ष पर्यटन विषयक सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे मागणी केली आहे.
If the voter list of Ratnagiri District Central Co-operative Bank, which has been stalled for the last two years, should be renewed The Government of Maharashtra should give the right to vote in the election of the District Central Co-operative Bank to the newly formed co-operative societies in the Innovative Co-operative Society campaign. Guhagar taluka Bharatiya Janata Party president Nilesh Surve has made such a demand to the Ratnagiri district deputy registrar.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे रत्नागीरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणुक स्थगीत करण्यात आली होती. खरं म्हणजे एप्रिल 2020 च्या दरम्यान ही पंचवार्षीक निवडणुक होणे अपेक्षीत होती. त्यानुसार जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांची त्यावेळी असणारी आर्थिक परिस्थिती, त्यांचे व्यवहार लक्षात घेऊन त्यावेळी त्या त्या परिस्थितीनुसार मतदार यादी निश्चित करण्यात आली होती. मात्र कोरोना संक्रमणामुळे 31 ऑगस्ट 2021 पर्यंत या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. आता नव्याने होणाऱ्या जिल्हा बँकांच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दोन वर्षांपुर्वी निश्चित केलेली मतदार यादी बदलली गेली पाहिजे. कारण दोन वर्षांमध्ये प्रत्येक संस्थांची आर्थिक परिस्थिती, त्यांचं व्यवहार हे नक्कीच बदललेले आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र शासनाने नाविन्यपुर्ण योजनेतून 2 वर्षांपूर्वी अनेक सहकारी संस्थांना मान्यता दिली आहे. रत्नागीरी जिल्हयात या नाविन्यपुर्ण योजनेतुन जवळपास 78 सहकारी संस्था विवीध उद्देशाने स्थापन करुन नोंदणीकृत झाल्या असुन सदरच्या संस्था जिल्हा बँकेच्या सभासदही झाल्या आहेत. या संस्थांना मान्यता मिळून आणि जिल्हा बँकेचे सभासदत्व स्वीकारून दोन वर्षे पूर्ण झालेली असल्याने भविष्यात होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या नव्याने निर्माण झालेल्या सहकारी संस्थाना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी निलेश सुर्वे यांनी केली आहे.