• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाची नियमावली जाहीर

by Ganesh Dhanawade
August 28, 2021
in Old News
21 0
1
गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाची नियमावली जाहीर
41
SHARES
117
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश मिळणार, इतरांना करावी लागणार आरटीपीसीआर टेस्ट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयात सध्या कोविड संसर्ग स्थिती नियंत्रणात असली, तरी येणा-या गणेशोत्सव कालावधीमध्ये हीच स्थिती अबाधित राहावी, यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियमावली निश्चित केली आहे. जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी शुक्रवारी ही नियमावली जाहीर केली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोविड संसर्ग स्थिती नियंत्रणात असली तरी येणाऱ्या गणोशोत्सव कालावधीमध्ये हीच स्थिती अबाधित रहावी, यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांनी लसीचे दान डोस घेतले असतील तर त्यांना कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. मात्र, ज्या प्रवाशांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले नसतील अशा व्यक्तीची जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी करण्यात येईल. या चाचणीत ज्या व्यक्ती बाधीत आढळतील त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल. जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी केलेली असल्यास प्रवेशावेळी प्रमाणपत्र सादर करावे. जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आणि जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी १ सप्टेंबरपासून एसटी गाड्या पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणार आहे. प्रवास करताना एसटी, रेल्वेमध्ये प्रवाशांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, व त्याची जबाबदारी वाहक व चालक यांची असेल, गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी स्वागत केंद्र म्हणून मंडप उभारण्यात येतील. जेणेकरून वाहन चालकाला थोडीशी विश्रांती मिळू शकेल. तसेच गणेशोत्सव कालावधीत अपघात टाळण्यासाठी अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणेसह रुग्णवाहिका व इतर यंत्र सामग्री सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्व. गणपती बसवण्यात येउ नयेत असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. सार्व. गणपती बसवल्यास तो दीड दिवसाचा असावा, असे आवाहन करण्यात येत आहे. श्रीगणेश आगमन व विसर्जनवेळी मिरवणूक काढूनये, आरती, भजन,कीर्तन जाखडी या सारख्या कार्यक्रमांना गर्दी करण्यात येउ नये. शासनाने नेमून दिलेल्या मानकाप्रमाणे गणेशमूर्ती असावी.सजावट करताना शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिक, थर्माकोल, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा शक्यतो वापर करु नये व अशा मूर्तीचे विसर्जन घरगुती स्वरूपात करावे. प्रसाद देणे टाळावे अथवा सुका मेवा,सुके पदार्थ,पूर्ण फळ याचा प्रसाद द्यावा. मिठाईमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याच्या अन्न व औषध प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वनिप्रदूषण टाळावे, नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडे कार्यक्रमांना जाणे टाळावे. विसर्जन घराच्या आवारात करावे, घरच्या घरी विसर्जन करणे शक्य नसेल तर कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या तलाव, हौदयात गर्दी न करता विसर्जन करावे.न.प., ग्रा. पं. यांच्यामार्फत गणेशमूर्ती संकलन वाहनाची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून गर्दी टाळणे शक्य होईल, असे आदेशात म्हटले आहे.

Tags: covid infectionGaneshotsavGovernmentGuhagarGuhagar NewsGuidelinesMarathi NewsNews in Guhagarअन्न व औषध प्रशासनकोविड संसर्गगणेशमूर्तीगणेशोत्सवजिल्हा प्रशासनटॉप न्युजताज्या बातम्याध्वनिप्रदूषणनियमावलीमराठी बातम्यारेल्वेलोकल न्युजसार्वजनिक बांधकाम विभाग
Share16SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.