गुहागर : आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विधुत प्रकल्पाच्या वतीने स्वच्छता अभियानास प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ए. के. सामंता यांच्या हस्ते आरजीपीपीएल हाऊसिंग कॉलनी समोरील स्थानिक हॉटेल व्यावसायिकाला कचरा पेट्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री. ए. के. सामंता यांनी प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक पातळीवर प्रत्येक ठिकाणी २४ x ७ करावयाचे स्वच्छता मिशनचे महत्व पटवून दिले. यावेळी एजीएम श्री. सी. एस. थॉमस, आरजीपीपीएलचे एचआर प्रमुख डॉ. जॉन फिलिप व अन्य अधिकारी उपस्थित होते.