• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंजनवेल ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना मोफत औषध वाटप

by Ganesh Dhanawade
September 26, 2020
in Old News
17 0
0
अंजनवेल ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना मोफत औषध वाटप
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर :  महाराष्ट्र राज्यात कोरोना संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना संक्रमणापासून आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांना वाचविण्यासाठी निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलने उपाययोजना सुरू केली आहे.  या योजनेअंतर्गत निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलने बालरोग तज्ञ डॉ.शशांक ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजनवेल ग्रामपंचायत आरोग्य उपचार केंद्राद्वारे ग्रामस्थांना मोफत औषध वाटप सुरू केले आहे.  ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 
या उपचार केंद्रात रविवार ते शुक्रवार दररोज सकाळी ९ ते १०.३०  वाजेपर्यंत व सायंकाळी ४ ते ५.३० वाजेपर्यंत डॉ. शशांक ढेरे हे सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी व डोकेदुखी असलेल्या रुग्णांना तपासून औषध उपचार देतात.  तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कोणी नॉर्मल, लक्षणे नसलेला परंतु पॉझिटिव्ह होम क्वारंटाईन रुग्ण असेल तर त्याला भेट देऊन औषधोपचाराची व्यवस्था करतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून व कोरोना संक्रमणावर मात करण्यासाठी ग्रामस्थांची रोग प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामस्थांना व्हिटॅमिनयुक्‍त औषधे देण्याचा ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलने एक उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ५५० कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला व्हिटॅमिनयुक्त औषध वाटप करण्यात आले. तसेच उर्वरित कुटुंबांना औषध वाटप चालू आहे.  या उपक्रमासाठी होणारा खर्च निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलच्या ग्रामनिधीतून करण्यात येत आहे.  
           यावेळी सरपंच यशवंत बाईत, उपसरपंच आत्माराम मोरे, सदस्य जवाहर तांडेल, सदस्या श्रीम. स्वाती वाघे, श्रीम. वेदिका भुवड, श्रीम. अनिता मेढेकर, व श्रीम. साक्षी सैतवडेकर, ग्रामविकास अधिकारी विलास बैकर, डॉ. शशांक ढेरे, परिचारिका पूजा जाधव, ग्रामपंचायत शिक्षिका श्रीम. अहिरराव, श्रीम. देवळेकर, श्रीम.  गुळेकर, श्रीम. पड्याळ, श्रीम.  मुकादम व कु. पाटणकर,  संतोष, सागर, अनिष व वैभव आदी उपस्थित होते.

Tags: AnjanvelCoronaCovid19GuhagarGuhagar NewsHealth treatment centerMarathi NewsNews in Guhagarअंजनवेलआरोग्य उपचारकेंद्रग्रामपंचायत अंजनवेलटॉप न्युजताज्या बातम्याबालरोगतज्ञमराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.