मनसे कार्यकर्ते प्रमोद गांधी यांचे सहकार्य
गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना कोकण व पश्चिम महाराष्ट्तील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी मदतीचा हात पुढे केला. अनेकजण प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात जाऊन बचाव व मदत कार्यात सहभागी झाले. याच अनुषंगाने मनसे नेते शिरीष सावंत, राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विश्वास मुधोळे यांच्या नेतृत्वाखाली व मनसे सैनिक व उद्योजक प्रमोद गांधी यांच्या सहकार्याने गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर व तालुक्यातील मनसैनिक यांनी चिपळूण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
After Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray appealed to Maharashtra soldiers to help the flood victims in Konkan and western Maharashtra, a large number of Maharashtra soldiers extended a helping hand. Guhagar taluka president Vinod Janwalkar and Mansainik of the taluka distributed essential items to the flood victims in Chiplun.
मनसे सैनिक व मुंबईतील सुप्रसिद्ध उद्योजक प्रमोद गांधी यांनी पूरग्रस्त गरजूंना मदतीचा खारीचा वाटा म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे किट तसेच झोपण्यासाठी लागणारे अंथरूण साहित्य किट, महिलांसाठी लागणारे कपड्याचे वाटप करण्यात आले. तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर हे चिपळूण परिसराची पाहणी करून आपल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पुरानंतर गेली दिवस मदत कार्य करत आहेत.
या कार्यात त्यांना प्रमोद गांधी व भातगाव, कौंढर काळसुर येथील मनसे सैनिक यांचे विशेष सहकार्य मिळाले. यापुढे सहकार्य असेच पुढे सुरू राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले. चिपळूण येथे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मनसे सैनिक प्रमोद गांधी, तेजस पोफळे, सचिन गडदे, स्वप्नील कांबळे, संजय भुवड, नितीन कारकर, दिनेश निवाते, कौस्तुभ कोपरकर, रुपेश घवाळे तुषांत शिरकर आदी सहभागी झाले होते.