गुहागर : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने सन 2021- 22 या चालू शैक्षणिक वर्षातही कोरोनाचे संकट लक्षात घेऊन तसेच सामाजिक सुरक्षिततेचे पालन करून गुहागर तालुक्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना व दिव्यांगांच्या मुलांना तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेचा हा उपक्रम गेली 19 वर्षे अखंडपणे सुरू आहे.
Guhagar Taluka Handicapped Rehabilitation Society distributed free books to all types of handicapped students and handicapped children as well as poor and underprivileged students in Guhagar taluka in the current academic year 2021-22 keeping in view the corona crisis and adhering to social security. This initiative of the organization has been going on continuously for the last 19 years.
यावेळी तालुक्यातील इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थी गरीब होतकरू विद्यार्थी दिव्यांग पालक व संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरोनामुळे जीव गमावलेल्या सर्व स्थरातील लोकांसाठी श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री उदय रावणंग यांनी दिव्यांगांमध्ये शिक्षण घेण्याची जिद्द निर्माण व्हावी व त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने संस्थेतर्फे दरवर्षी मोफत वह्यांचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी गुहागर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, संस्थेचे सल्लागार व सर्पमित्र प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे, अभिषेक इंटरप्राईजेसचे मॅनेजर दिपक झगडे, ज्ञानेश्वर झगडे, सरचिटणीस श्री. सुनील रांजणे, खजिनदार श्री. सुनील मुकनाक आदी उपस्थित होते. यावेळी सर्व एकूण 84 विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत वह्यांचे व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा. म्हात्रे यांनी संस्थेचे कौतुक केले. कोरोना सारख्या महामारीच्या साथीमध्येही सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी काम करणारी राज्यातील एकमेव संस्था आहे. संस्थेचे ध्येय उद्दिष्ट खूप मोठे आहे. ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. उपमुख्याध्यापक कांबळे म्हणाले, संस्था गेली 19 वर्षे अविरतपणे कार्यरत आहे. या संस्थेचे कार्य उत्तम असून संस्थेतील अपंगांच्या समस्या सोडविण्यासाठी ही संस्था सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहे. संस्थेने 27 अपंगाना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. संस्थेच्या असणाऱ्या गरजा व समस्या सोडवण्यासाठी समाजातील लोकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सल्लागार श्री. विनायक ओक, संचालक श्री. प्रवीण मोहिते, श्री. अनिल जोशी, श्री. प्रकाश कांबळे, श्री. संतोष घुमे, श्री. राजेश खामकर, श्रीमती नीता पालशेतकर यांनी विशेष सहकार्य केले.