गुहागर : महाराष्ट्र शासन पुरस्कृत संजय गांधी योजने अंतर्गत केंद्र शासना मार्फत कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्ग गुहागर तालुक्यातील निराधार महिलांना तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
Under the Sanjay Gandhi Yojana sponsored by the Government of Maharashtra, under the Family Financial Assistance Scheme through the Central Government, donations were distributed to destitute women in Guhagar taluka at the hands of Tehsildar Pratibha Varale.
गुहागर तालुक्यातील ७ लाभार्थी महिलांना कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत लाभ मंजूर झाला आहे. तालुक्यातील मौजे कोंडकारूळ येथील श्रीमती वैदेही जीवन पालशेतकर, आरे नागदेवाडी येथील श्रीमती रमिला रमेश साटले, श्रीमती नेहा महेंद्र साटले, गुहागर खालचापाट येथील श्रीमती संगीता संजय वराडकर, पालपेणे तळ्याचीवाडी येथील श्रीमती सानिका संदिप रहाटे, धोपावे येथील श्रीमती सरीता सदानंद महाडिक, खोडदे येथील प्रणिता प्रभाकर गुरव यांना प्रत्येकी रूपये २०,०००/- चा धनादेश गुहागर तहसिलदार कार्यालय येथे तहसिलदार प्रतिभा वराळे यांची हस्ते देण्यात आला.
यावेळी संजय गांधी शाखेतील विश्वनाथ वासावे, अव्वल कारकुन सुनिल वराडकर, महसूल सहाय्यक व संजय गांधी योजनेचे माजी अध्यक्ष विलास गुरव आदी उपस्थित होते.