गुहागर : एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजना गुहागर पंचायत समिती यांच्या वतीने “माझी कन्या भाग्यश्री” लाभार्थी मुलींना २५ हजार रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आले.
Integrated Child Development Project Scheme on behalf of Guhagar Panchayat Samiti to the beneficiary girls of “My Daughter Bhagyashree”A check of Rs. 25,000 was distributed .
गुहागर पंचायत समितीची आढावा बैठक नुकतीच पंचायत समिती सभागृह येथे पार पडली. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, महीला बालकल्याण सभापती भारती सरवणकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती रेश्मा झगडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे, गुहागर पंचायत समिती सभापती पूर्वी निमुणकर, उपसभापती सिताराम ठोंबरे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, सहा. गटविकास अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भोसले आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.
मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे, यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेमध्ये एक किंवा दोन मुली नंतर मातेने- पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर अनुज्ञेय रक्कम मुलीच्या नावे शासनाकडून बँकेत गुंतवणूक करण्यात येते. तालुक्यातील ओवी विकास हुंबरे, (कारुळ), सुहानी सुहास ठोंबरे (शीर), स्वानंदी हृषिकेश भोसले (आबलोली), अवनी सचिन मोहिते (पालपेणे), पूर्वा संतोष जांगळी (गुहागर), आरोही विजय पड्याल (अंजनवेल), अनन्या प्रवीण पवार (पाटपन्हाळे) आदींना २५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
