शृंगारतळीच्या मालाणी एम्पोरियमचे सहकार्य
गुहागर : आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने संपूर्ण रत्नागिरी जिल्हात राबविण्यात येणाऱ्या कोविड पालक अभियानांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येणार आहेत. या अभियानाचा शुभारंभ गुहागर येथे करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. राजेंद्र आरेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष श्री. साहिल आरेकर, आरडीसी बँकेचे संचालक श्री. अनील जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर शहराध्यक्ष श्री. मंदार कचरेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष श्री. प्रथमेश वेदरे, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष सौ.मृणाल विचारे, नगरसेवक श्री. अमोल गोयथळे, श्री. संतोष मोरे, श्री. श्रीधर बागकर, श्री. तुषार सुर्वे, श्री. रोहित मालप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राकेश राऊत, श्री. निहाल सुर्वे, श्री. दीपक शिरधनकर, श्री. सुनील गोयथळे, कु. शिवाली आरेकर आदी उपस्थित होते.