मर्दा ॲण्ड सन्स्चे शृंगारतळीत उद्घाटन
गुहागर शहरातील कापड आणि भांड्याचे व्यापारी असलेल्या मर्दा परिवाराने शृंगारतळीतही गृहोपयोगी, विविध प्रकारातील भांडी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, स्वच्छता उपकरणे आदी साहित्याचे दुकान सुरु केले आहे. यापूर्वी मर्दा लाहोटी कलेक्शन या नावाने कापडाचे दुकान शृंगारतळीतून तालुकावासीयांना सेवा देत आहे.
गुहागरमधील कापड आणि भाड्यांचे दुकानाला 100 वर्षांची परंपरा आहे. सुमारे 100 वर्षांपूर्वी मर्दा परिवारातील एक व्यक्ती दाभोळमधुन गुहागरमध्ये आली. त्यांनी येथे गोळ्या, बिस्कीटांच्या व्यवसायापासून सुरवात केली. हळुहळू मर्दा परिवाराने कांदे बटाटे विक्री, कपडे विक्री, भांडी विक्री असा व्यापार सुरु केला. आता हा परिवार पूर्णपणे कोकणवासीय झाला आहे.
याच परिवाराने दसऱ्याच्या मुहूर्तावर शृंगारतळीत हॉटेल हेमंत समोर, सखिना कॉम्प्लेक्समध्ये मर्दा ॲण्ड सन्स यानावाने नवे दुकान सुरु केले आहे. यामध्ये स्टीलची भांडी, डबे, सर्व प्रकारचे प्लास्टीकवेअर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्टेशनरी, हाऊस क्लिनिंग उत्पादने, क्रॉकरी, आदी वस्तुंची वैविध्यपूर्ण उपलब्धता आपल्याला पहायला मिळते.
या दुकानाचे उद्घाटन परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्रीकिशन मर्दा (भाई) व जसकरण मर्दा (बापुजी) यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी इचलकरंजीचे टेक्साईल उद्योजक राजेश मर्दा, चिपळूणचे उद्योजक राजेश पल्लोड, सुरतचे साडी उत्पादक नटवर गोपाल छापरवाल, मर्दा परिवारातील अन्य व्यापारी, उद्योजक उपस्थित होते. शृंगारतळीमधील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते नासिमशेठ मालाणी, शोएब मालाणी, कैसर बोट, अजित बेलवलकर, खातु मसाले उद्योग समुहाचे शाळीग्राम खातू , गुहागर शृंगारतळीमधील व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक यांनी देखील नव्या दुकानाला भेट दिली. मर्दा परिवारातील सर्व सदस्य दुकानाला भेट देण्यासाठी येणाऱ्या सर्व अतिथींचे अगत्यूपर्वक स्वागत करत होते.
यावेळी गुहागर न्यूजशी बोलताना आशिष व अभिजित मर्दा यांनी सांगितले की नव्या दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी आम्ही विशेष योजना आणली आहे. आज खरेदी करणाऱ्या ग्राहकाला दिवाळीचे कुपन दिले जाणार आहे. त्यामुळे दिवाळीतही खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. मात्र या योजनेसाठी आम्ही ग्राहकांची संख्या निश्चित केलेली आहे. त्यामुळे जे लवकर दुकानात खरेदीसाठी येतील त्यांनाच हा लाभ घेता येईल. तेव्हा तालुकावासियांनी मर्दा ॲण्ड सन्स् च्या दुकानाला लवकरात लवकर भेट द्यावी. असे आवाहन आशिष व अभिजित मर्दा यांनी केले आहे.