मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी उपक्रेंद : नियमित वर्ग सुरू झाले
रत्नागिरी : विद्यमान शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उप परिसरात इंडस्ट्रिअल सेफ्टी अँड मॅनेजमेंट हा डिप्लोमा (Diploma in Industrial Safety and Management) कोर्स सुरू करण्यात आला आहे. या डिप्लोमा कोर्स साठीची सदर वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून नियमित वर्ग सुरू झाले आहेत.
बी. एस सी. तसेच इंजिनिअरिंग पदवी अथवा डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा Diploma in Industrial Safety and Management कोर्स आपल्या रत्नागिरी मध्ये उपलब्ध करून देण्याचे काम रत्नागिरी उप परिसराने केले आहे. कोर्स च्या अभ्यासक्रमात औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व स्वच्छता, रासायनिक प्रक्रिया, सुरक्षा व्यवस्थापन, कारखान्यात उद्भवणारे संभाव्य धोके, सुरक्षा विषयक कायदे व व्यवस्थापन आदी महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश करण्यात आला आहे. Diploma in Industrial Safety and Management कोर्स साठी विद्यार्थ्यांना इंडस्ट्री मधील अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन लाभत आहे. या डिप्लोमा कोर्स ला प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षा व्यवस्थापन, रासायनिक प्रक्रिये दरम्यान आवश्यक सुरक्षित हाताळणी, वैयक्तिक सुरक्षा या बाबतचे कौशल्य मिळण्यास मदत होत आहे. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेले विद्यार्थी विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये सुरक्षा अधिकारी, सुरक्षा सहाय्यक, सुरक्षा समुपदेशक म्हणून सेवा देऊ शकतील.
या Diploma in Industrial Safety and Management कोर्स चा कालावधी 1 वर्षाचा असून पुढील शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल. या संदर्भातील अधिक माहितीसाठी प्राध्यापक श्री विजय गुरव ( फोन नं. +918788732487 / +919860027889 ) यांना संपर्क करावा.सदर अभ्यासक्रमाची माहिती मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर रत्नागिरी उपपरिसर वेबपेजवर उपलब्ध आहे.