गुहागर : गिमवी – देवघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप मारूती जाधव याचे नुकतेच दुखःद निधन झाले.
Gimvi – Devghar maji Sarpanch of Deoghar Gram Panchayat And village social activist Dilip Maruti Jadhav passed away tragically recently.
कै. दिलीप जाधव हे आदर्श शिक्षण संस्था देवघर पंचक्रोशीचे जेष्ठ संचालक व शालेय शिक्षण समीतीचे सभापती होते. सहकारी सोसायटीचे चेअरमन होते. सरपंच म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. गिमवी शिवसेना शाखेचे ते शाखाप्रमुख होते. लिखाणाची आवड म्हणून त्यांनी मुक्त बातमीदार म्हणूनही काम केले आहे. आमदार भास्कर जाधव यांचे ते जवळचे सहकारी होते. गुहागर तालुका मराठा क्षत्रिय समाज ते आजिव सदस्य होते. राजकारणाबरोबर समाज कार्यातही त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. त्याचे बारावे उत्तर कार्य गुहागर तालुक्यातील गिमवी येथे २४ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी झाले.