राज्यात एकाच दिवसात ७२ हजार ७०० डाऊनलोड
पुणे : राज्यात सोमवारी एकाच दिवसात विक्रमी ७२ हजार ७०० डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उतारे नागरिकांनी डाऊनलोड केले. या माध्यमातून राज्य शासनाला २३ लाख रुपयांचा महसूल एकाच दिवसात प्राप्त झाला.
In a single day in the state, a record 72,700 digitally signed Satbara and account transcripts were downloaded by the citizens. Through this, the state government received revenue of Rs. 23 lakhs in a single day.
यापूर्वी १६ जून रोजी ६२ हजार उतारे डाऊनलोड करण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी सातबारा संगणकीकरण आणि ई-फेरफार प्रकल्पाला यश मिळताना दिसत आहे. याबाबत ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप म्हणाले, ‘सामान्य शेतकऱ्यांना केव्हाही आणि कुठेही (पान २ वर) (पान १ वरून) सातबारा व खाते उतारे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या महाभूमी संकेतस्थळावरून सोमवारी (२१ जून) आतापर्यंतची उच्चांकी सेवा देण्यात आली. एका दिवसात तब्बल ७२ हजार ७०० डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उतारे डाऊनलोड करण्यात आले. तलाठी कार्यालयातून दोन लाख ४८ हजार सातबारा व खाते उतारे वितरित करण्यात आले, तर बँकांमधून दोन्ही प्रकारचे मिळून ५६०० उतारे घेतले गेले. भूलेखवरून चार लाख पाच हजार विनास्वाक्षरित विनाशुल्क (फक्त माहितीसाठी) सातबारा, खाते उतारे घेण्यात आले. एका दिवसात २३ लाख रुपयांचा महसूल नक्कल शुल्क स्वरूपात जमा झाला आहे.’
महसूल विभागाकडून जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचा लाभ अधिकाधिक तंत्रसाक्षर होत असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना होत आहे. आतापर्यंत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, फेरफार उतारा, आठ-अ खाते उतारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला. चालू वर्षांत मार्च महिन्यात चार वेळा आणि एप्रिल महिन्यात तीन वेळा मोठय़ा संख्येने उतारे नागरिकांनी डाऊनलोड केले.