श्रीकांत मोरे यांचे महावितरण अभियंत्यांना पत्र
गुहागर : तालुक्यातील वेळंब गावातील गेले अनेक वर्ष धोकादायक स्थितीत असलेले विद्युत खांब तातडीने बदलण्याची मागणी वेळंब येथील भाजप कार्यकर्ते श्रीकांत मोरे यांनी शृंगारतळीचे सहाय्यक उपअभियंता यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.
Shrikant More, a BJP activist from Velamba, has demanded immediate replacement of a power pole in Velamba village in the taluka which has been in a dangerous condition for the last several years.
श्रीकांत मोरे यांनी या तक्रारी अर्जात म्हटले आहे की,आम्ही २०१५ साली वेळंब गुरववाडी येथील असणारे विद्युत खांब धोकादायक असल्याने ते बदलण्याचे लेखी पत्र आपणास दिले होते. मात्र त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. सद्या हे विद्युत खांब अतिशय धोकादायक स्थितीत असून सध्याच्या वादळी व पावसाळी वातावरणात भर वस्तीत असणारे हे विद्युत खांब धोकादायक बनून त्यामुळे दुर्घटना होऊ शकते. तसेच अश्याच पध्दतीने गावातील इतर पोलांबाबत देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे यावर वेळीच लक्ष न दिल्यास होणाऱ्या दुर्घटनेस सर्वस्वी महावितरण जबाबदार असणार आहे. त्यामुळे याकडे आपण महावितरणने गांभीर्याने लक्ष देऊन सदरचे धोकादायक विद्युत खांब तत्काळ बदलावेत, अशी मागणी केली आहे.