संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांशी साधला संवाद
दिल्ली, ता. 23 : आपल्या छात्रांमध्ये एक नेता, सैनिक, कलाकार, संगीतकार आणि सर्वात उत्तम माणूस हे गुण राष्ट्रीय छात्र सेना रूजवत आहे. तरूणांना एकसंध आणि शिस्तबद्ध शक्तीमध्ये रूपांतरित करून एनसीसी (National Cadet Corps) उत्तम सेवा करीत आहे. असे सांगत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय छात्र सेनेचे कौतुक केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणा-या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांशी संवाद साधला. Defense Minister interacts with NCC students
दिल्ली कँटोन्मेंटच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये (National Cadet Corps) यावर्षीच्या रक्षा मंत्री पदकाची आणि प्रशस्तीपत्रक विजेत्यांची घोषणा यावेळी करण्यात आली. यंदाचे रक्षा मंत्री पदक दिल्ली संचालनालयाच्या छात्र दिव्यांशी आणि कर्नाटक आणि गोवा संचालनालयाचे लेफ्टनंट अक्षय दीपकराव मंडलिक यांना प्रदान करण्यात येणार आहे. गुजरात संचालनालयाचे छात्र कॅप्टन धीरज सिंह, महाराष्ट्र संचालनालयाचे सीयूओ सोमेश मनोज सिन्हा, ईशान्य क्षेत्र संचालनालयाचे सीयूओ केएच मोनिता सिंघा आणि पश्चिम बंगाल आणि सिक्कीम संचालनालयाचे छात्र आदर्श शर्मा यांना रक्षा मंत्री कमेंडेशन कार्ड प्रदान करण्यात येणार आहे. याची घोषणा एनसीसीचे डीजी लेफ्टनंट गुरबीरपाल सिंग आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आली. Defense Minister interacts with NCC students
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) अजूनही कोविड-19 पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांबरोबर आभासी माध्यमातून संवाद साधला. ते म्हणाले की, कठोर परिश्रम हीच यशाची गुरूकिल्ली आहे. राष्ट्रीय छात्र सेना (National Cadet Corps) छात्रांमध्ये अनेक गुण विकसित करत आहे. त्यामुळे भविष्यात हे छात्र स्वतःचा मार्ग तयार करू शकणार आहेत. त्याचबरोबर समाजालाही नवीन दिशा देऊ शकणार आहेत. छात्रांनी जीवनाचा उद्देश शोधावा आणि त्यासाठी संघटनेमध्ये शिकविण्यात येणारे ऐक्य, शिस्त, खरेपणा, धैर्य, एकोपा आणि नेतृत्व या गुणांचा अवलंब करावा. समाजामध्ये आपल्या कार्यातून ठसा उमटविणा-या एनसीसीच्या अनेक माजी विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घ्यावी. छात्रांनी मत्सर, प्रांत, धर्म, जात आणि वर्ग यांच्याविषयीच्या पूर्वग्रहांमुळे फूट पाडली जाणार नाही. यासाठी प्रयत्न करावेत. Defense Minister interacts with NCC students
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी यावेळी स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीचा यावेळी दाखला दिला. ते म्हणाले, ‘‘ विवेकानंद यांच्या शब्दात सांगायचे तर तुम्ही नरकेसरी आहात, तुम्ही शुद्ध आत्मा आहात, तुमच्यामध्ये अनंत क्षमता आहेत आणि तुम्ही परिपूर्ण आहात, या संपूर्ण विश्वाचे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे.’ तुमच्यासारख्या छात्रांनी भव्य स्वप्ने पहावीत आणि भीती आणि संशय अशा बंधनांना झुगारून त्या स्वप्नांच्या पूर्तीचे ध्येय साध्य करावे, त्यासाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे आवाहन राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी यावेळी केले. Defense Minister interacts with NCC students