जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती
रत्नागिरी : राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे जाहीर केल्यानंतर खळबळ उडाली. हा रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील 80 वर्षीय वृद्ध महिला होती. १३ जूनला तिचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटल्याप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयामध्ये varient of Concern चे ९ रुग्ण सापडलेले आहेत. याबाबतचा अधिकृत अहवाल वरिष्ठ कार्यालयामार्फत ई – मेलद्वारे दि . २०.०६.२०२१ रोजी प्राप्त झालेला आहे .सदरील ९ रुग्णांच्या चौकशी व तपासणीनंतर संगमेश्वर तालुक्यामधील एक महिला रुग्ण वय अंदाजे ८० वर्षे यांचे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यन दि . १३.०६.२०२१ रोजी निधन झालेले आहे . उर्वरित ०८ रुग्ण रुग्णालयामधुन उपचार घेवुन डिस्चार्ज होवुन घरी गेलेले आहेत . सद्यस्थितीत सर्व ०८ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे असेही स्पष्ट केले.