DCH & CCC of 100 beds
गुहागर, ता. 14 : शासनाने अधिग्रहीत केलेल्या निरामय रुग्णालय आणि जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात 100 खाटांचे कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर (DCH & CCC of 100 beds) करण्याचे नियोजन आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग तर्फे या अधिग्रहीत इमारतींचे पर्यवक्षेण सुरु आहे.


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून शासनाने आधीपासून आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यास सुरवात केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, शासनाने निरामय रुग्णालयाच्या इमारतीसह या परिसरातील अन्य इमारती ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या निवासासाठी असलेल्या 14 कॉटेज, कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या 12 कॉटेज, त्याचप्रमाणे नवोदय विद्यालय म्हणून वापरात येणारी संपूर्ण इमारत अधिग्रहित करण्यात आली आहे. जवाहर नवोदय विद्यालय बंद झाल्यानंतर ही इमारत महाराष्ट्र राज्य औद्यागिक विकास महामंडळाच्या ताब्यात होती.(DCH & CCC of 100 beds)
संबधित बातमी : तिसऱ्या लाटेत निरामयची संधी साधली
यामधील निरामय रुग्णालयामध्ये केंद्रीय ऑक्सिजन प्रणाली (Centralised oxygen system) आहे. रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. वैद्यकिय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष, तपासणी कक्ष अशी रचना आहे. त्यामुळे रुग्णालयाची इमारतीचा हा भाग डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी तर उर्वरित भाग कोविड केअर सेंटरसाठी वापरण्याचे नियोजन आहे. निरामय रुग्णालयाच्या एका बाजूला असलेल्या वसाहतीमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. रुग्णांची संख्या वाढली तर नवोदय विद्यालयाची इमारतही वापरता येणार आहे. (DCH & CCC of 100 beds)
या सर्व इमारती आणि वीज, पाणी आदी सुविधांची तपासणी सध्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरतर्फे सुरु आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखभाल दुरुस्तीसाठी किती खर्च येईल याचे अंदाजपत्रक बनविण्यास सांगितले आहे. याची कार्यवाही सध्या सुरु आहे. सध्या तांत्रिकदृष्ट्या अधिग्रहीत इमारती ग्रामीण रुग्णालयाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. दुरुस्ती देखभालीची कामे झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालय कोविडची तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेवून सदर इमारतींमध्ये पुढील कार्यवाही सुरु करणार आहे. (DCH & CCC of 100 beds)