विरार, नालासोपारा, वसई रहिवासी संघ आयोजित
गुहागर : कोरोना काळात दिवस- रात्र सेवा देणाऱ्या गुहागर तालुक्यातील डॉक्टर, पोलिस, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आधी ७५ कोविड योद्धांचा व गुहागरची लोककला जिवंत ठेवणाऱ्या १०० कलाकारांचा विरार – नालासोपारा – वसई रहिवासी संघातर्फे मुंबईत नुकताच सत्कार करण्यात आला.
भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉक्टर विनय नातू आणि भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या हस्ते या कोविड योद्धांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गुहागर तालुक्यातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला शिक्षिका साधना तेरेकर, माजी पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर, गोविंद गुंजाळकर, भाजप किसान मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संदीप गोरीवले, भाजप विरार अध्यक्ष नारायण मांजरेकर, समाजसेवक किशोर भेरे, राजाराम मोरे, दीपक मांडवकर, योगेश कदम, बबन कांबळे, गंगाराम आलीम, अशोक घाणेकर, जितेंद्र वेंगुर्लेकर, श्रीराम विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज डाफले आणि सहकारी यांनी मेहनत घेतली. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांना गुहागर तालुका कुणबी समाजाचे ३०० प्रभात दिनदर्शिकेचे मोफत वाटप केले.