गुहागर : भाजपा ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे संतोष जैतापकर यांनी कोरोना काळात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात दिल्याबद्दल येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने त्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
Santosh Jaitapkar, Ratnagiri district president of BJP OBC Morcha and a pioneer in social work, was honored as a corona warrior for his helping hand to patients and their relatives during the Corona period.
श्री. जैतापकर यांनी कोरोना काळात रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे येथे राहणाऱ्या तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाना लागणारे सर्व सहकार्य करण्यासाठी वैद्यकीय टीम तयार केली होती. ४०० पेक्षा जास्त रूग्णांना या टीमने सहकार्य केले. या टीममध्ये तालुक्यातील मुंबई, ठाणे, पालघर आणि गुहागर मधील २० डॉक्टर १०० परिचारिका आणि ८० इतर वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी काम केले. तसेच गुहागरसह मुंबईतील शेकडो गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. अधिक उपचारासाठी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेणे, आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्यांचे बिले कमी करून घेणे, तसेच कोरोना प्रतिबंध साहित्याचे वाटप, महत्वाच्या ठिकाणांचे निर्जंतुकिकरण करण्याचे काम संतोष जैतापकर यांच्या माध्यमातून करण्यात आले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.