गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे तहसीलदारांना पत्र
गुहागर : वाढत्या कोरोनाच्या काळात 45 च्या पुढील सर्व नागरिकांना शासनामार्फत कोविड प्रतिबंधक लस दिली जात आहे. हे लसीकरण तालुक्यात गुहागर, चिखली, हेदवी व आबलोली या ठराविक ठिकाणीच होत आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. यासाठी तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे, या मागणीचे पत्र गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने तहसीलदार सौ लता धोत्रे यांना देण्यात आले.
All citizens over the age of 45 are being vaccinated against covid by the government during the growing corona period. This vaccination is being done at Guhagar, Chikhali, Hedvi, Kolvali and Abloli in the taluka. Therefore, there is a large crowd of citizens to get vaccinated. For this, a letter of demand was given to Tehsil Lata Dhotre on behalf of Guhagar Taluka Handicapped Rehabilitation Organization to start vaccination centers in every primary health center and primary school in the taluka.
तालुक्यात काही ठराविकच लसीकरण केंद्र असल्याने नागरिकांची गर्दी आणि लसीकरणाचा साठा मर्यादित असल्यामुळे अनेक नागरिकांना लस मिळत नसल्याने परत जावे लागत आहे. त्यामुळे होणाऱ्या गैरसोयमुळे व वाढणाऱ्या गर्दीमुळे covid-19 प्रसार होण्यास अधिकच मदत होत आहे. त्यातच तालुक्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगाना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 1 मेपासून 18 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला जाण्याची शक्यता आहे. शासनाचे पल्स पोलिओ डोस तसेच इतर डोस प्रत्येक गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळा, वाड्यांवस्त्यांमध्ये दिली जातात. याच धर्तीवर जर कोविड लसीकरणाची व्यवस्था प्रत्येक गावात करण्यात आली तर तेथील ग्रामपंचायतीमार्फत व प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत चांगले नियोजन करून सर्व नागरिकांना गर्दी न करता व वेळेची बचत करून लसीकरण करता येईल. मोठ्या प्रमाणात कमी वेळेत जास्तीत जास्त लसीकरण होण्यास मदत होईल. तरी या सर्व बाबींचे नियोजन करून सर्वसामान्य नागरिक, जेष्ठ, सर्व प्रकारच्या दिव्यांगाना सुलभ लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.