• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोरोनाची चिंता वाढली

by Ganesh Dhanawade
July 8, 2021
in Old News
16 0
0
कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गेल्या २४ तासांत ८१७ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई : देशातील अनेक भागात निर्बंधातून सूट दिल्यानंतर आता कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ८१७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी ही आकडेवारी ५०० पेक्षा ही कमी होती. मात्र अचानक मृत्यूंमध्ये वाढ झाल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत ४५,८९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ४५,८९२ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत आणि ८१७ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. काल दिवसभरात ४४,२९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात नव्या कोरोना बाधितांच्या तुलनेने रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे. काही दिवसांपर्यंत कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे अधिक होते. ७ जुलै पर्यंत देशभरात ३६ कोटी ४८ लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. बुधवारी ३३ लाख ८१ हजार लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर आतापर्यंत सुमारे ४२ कोटी ५२ लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बुधवारी सुमारे १९ लाख कोरोना नमुना चाचण्या घेण्यात आल्या, ज्यांचा पॉझिटिव्हीटी दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
देशात आतापर्यंत ३ कोटी ७ लाख ९ हजार ५५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २ कोटी ९८ लाख ४३ हजार ८२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या ४ लाख ६० हजार ७०४ कोरोनाबाधित उपचाराधिन आहेत. तर आतापर्यंत ४ लाख ५ हजार २८ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना मृत्यूचे प्रमाण १.३२ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्ण २ टक्क्यांपेक्षा कमी आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. एकूण बाधितांच्या बाबतीतही भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात आहेत.

महाराष्ट्रात ९,५५८ नवे बाधित,आणखी १४७ रुग्णांचा मृत्यू

बुधवारी महाराष्ट्रात ९,५५८ नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत तर १४७ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या ६१ लाख २२ हजार ८९३ वर पोहोचली आहे तर आतापर्यंत एकूण १ लाख २३ हजार ८५७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या १ लाख १४ हजार ६२५ रूग्ण उपचार घेत आहेत. महाराष्ट्रातील संसर्गाचा दर हा १४.२ टक्के आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार मुंबईत बुधवारी ६६२ नवीन रुग्णांची नोंद केली गेली असून आणखी नऊ रुग्णांचा मृत्यू झाला.

Tags: CoronaCorona In GuhagarCorona NewsCovid19GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकोरोनाकोरोना बातम्याकोविड केअर सेंटरगुहागरातील कोरोनाटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.