गुहागर : कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जनजागृती करण्यात आली.
ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने आबलोली बाजारपेठ परीसर, वाडी-वस्तीवर सुचना देण्यात आल्या. बँका, हाॅटेल, दुकाने आदी ठिकाणी गर्दी न करणे, पार्सल सुविधा देणे, योग्य पद्धतीने मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कामाशिवाय घरातून बाहेर न पडणे याबाबत ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन यांच्या वतीने सुचना देण्यात आल्या. आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात कोरोना प्रादुर्भाव वाढू लागला आहे. परीणामी बाजारपेठेत तुरळक गर्दी असते. प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.