आजच्या वर्तमानपत्रामधील बातमी दुसऱ्या दिवशी कुणी वाचत नाही. एखादा लेख आवडला तर त्याचं कात्रण काढून ठेवतात, लिहिणाऱ्या व्यक्तीला पूर्वी पत्र पाठवत. हल्ली फोन मेसेज करतात. यापलीकडे त्या साहित्या बाबत फार उत्साह दाखवित नाही. अनेक लिहिते हात आहेत त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असते पण त्यांची पुस्तक होत नाहीत. कारण ते तत्कालीन लेखन असते. मात्र काही लेखन हे पुढील पिढीला संदर्भ म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडू शकते. याआधी अशी लेखांची पुस्तक क्वचितच प्रकाशित झाली आहेत हल्ली तर ते प्रमाण खूपच कमी आहे. कारण लोक मोबाईल वॅट्सअप, फेसबुकवरील साहित्य वाचून डिलीट करतात. अशा काळात वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले लेख वाचकांना भावतात आणि त्याचे पुस्तक प्रकाशित होते. ते आहे “ओघळलेले मोती “
प्रा. मनाली बावधनकर हे नाव साहित्य क्षेत्रात नवखे असले तरी सर्व परिचित हरहुन्नरी आदर्श शिक्षिका, कवयित्री, लेखिका, वक्त्या, आपल्याला आवडणारा उपक्रम छंद यात आवर्जून सहभागी होणाऱ्या, दिलेलं काम आणि स्विकारलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या , समाजातील घटना, प्रसंग याकडे डोळसपणे पाहणाऱ्या, त्याच्याविषयी सखोल विचार, चिंतन करणारी कुटुंब वत्सल महिला, विद्यार्थी प्रिय शिक्षिका, उत्तम वाचक, स्पष्टपणे मत व्यक्त करणाऱ्या, नवीन काही शिकण्याची, ऐकण्याची सतत धडपडआणि तळमळ अशा विविध रूपात वावरअसणाऱ्या प्रा. मनाली बावधनकर मॅडम यांना मी पंधरा वर्षे ओळखतो कारण त्या माझे मित्र पत्रकार मनोज तथा भय्या बावधनकर यांच्या पत्नी गुहागर मधील जुनियर कॉलेजातील प्राध्यापिका आणि आमच्या गुहागरच्या साहित्यिक कुटुंबातील सहकारी भगिनी असे ऋणानुबंध. त्यामुळं अनेकदा कविता आणि चर्चा सत्रातील त्यांचे विचार ऐकण्याचा योग आलाच पण वर्तमानपत्रातील त्यांचे विविध विषयावरील लेखनही वाचले आहे. वाचून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कोरोना आपत्ती लॉकडाऊनमुळे जवळपास वर्षभर त्यांचे ललित लेखांच पुस्तक “ओघळलेले मोती ” प्रकाशित करण्याचे राहिले होते. तो प्रकाशन सोहळा शनिवार दि .23 ऑक्टोबर 2021 रोजी गुहागरच भूषण ज्ञानरश्मि वाचनालयामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक, रसिक मान्यवर, अधिकारी, वाचक हितचिंतक यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखेत संपन्न झाला. मान्यवरांच्या सोबत प्रकाशन सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. याबद्दल मी आमच्या गुहागर मधील मसापच्या साहित्यिक बंधू – भगिनीना, कवी, अध्यक्ष रांजेंद्र आरेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद. दैनिक तरूण भारतने आपल्या “संवाद “या पुरवणीतून प्रकाशित केलेले लेख एकत्रित करून त्याचे पुस्तकात रुपांतर होणे ही गोष्टी आनंद देणारी आणि अभिमान वाटणारी आहे. परिस पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक 131 पृष्ठांच असून मुखपृष्ठ अरविंद शेलार यांनी पुस्तक शिर्षकाला साजेस रेखाटलेले आहे. ते वाचकास निश्चितच आकर्षित करील. आपल्या सासूसासरे यांच्या आदर प्रेमापोटी त्यांना हे पुस्तक अर्पण केले आहे. यापुस्तकाला प्रेरणादायी शुभेच्छा तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकूर यांच्या शुभेच्छा असून प्रस्तावना अतिशय मार्मिक शब्दात वाचकाला पुस्तक वाचनास आणि लेखिकेलाभविष्यातील लेखनासाठी प्रेरित करणारी पुस्तकातला सारांश सांगणारी प्रस्तावना इतिहासाचे अभ्यासक ग्रंथ चळवळीतले कार्यकर्ते अनेक लिहित्या हातांना प्रोत्साहन आणि संधी देणारे लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय चिपळूणचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी लिहिली आहे. विविध विषयांवरील एकूण चाळीस लेखांच हे पुस्तक वाचकाची उत्सुकता वाढवून वाचनास आणि त्यानंतर अंतर्मुख करण्यास लावते. पुस्तकाच मूल्ये थोडं जास्त वाटते, रेग्युलर पुस्तकासारखा आकार हवा होता अक्षर जुळणी, पुस्तक बांधणी उत्तम आहे. हे एक एक लेख वाचूनच कळेल. एका एका लेखावर स्वतंत्र आणि विचारपूर्वक चर्चा, लेख होतील. पहिलीच कथा “उंबरठा “यात लेखिका लिहितात “बिन उंबरठयाच्या खुज्या घरात आम्ही राहतो. उशीर का झाला विचारणारा उंबरठा आजही हवा आहे “याचा अर्थ लेखिका परिवर्तनाच्या विरोधी आहे असा नसून मुक्त स्वातंत्र्याच्या नावाने जे विदारक चित्रण समाजात दिसते आहे त्यास आळा असावा हेच त्या सांगतात. बिघडलेली यापेक्षा विस्कळीत झालेली कुटुंब व्यवस्था, दुरावलेले नातेसंबंध यांविषयी “कुटुंब”लेखात उत्तम विचार लिहिले आहेत. आज मोठं मोठया हुद्यावर महिला सौंदर्य प्रसाधन, सुंदर चेहरा घेऊनच नाही तर बुद्धी आणि चांगल्या विचाराने पुढे गेल्या आहेत हे त्या “सुंदर मी होणार या लेखातून उदाहरणं देऊन सांगत आहेत. काळ या लेखात त्यांनी बीरबल यांच एक वाक्ये लिहिलं आहे “ही वेळ सुध्दा निघून जाईल “सुखदुःखात जास्त अडकून राहू नये वेळ बदलत असते. आपण खंबीर असाव. “रांगोळी “आज दिसत नाही मुळात ती काढण्यास कुणी उत्सुक नाही. घराला, अंगणात लादी आली. रांगोळीचे छाप बाजारात मिळतात .लेखिका लिहितात “परंपरा, कला, संस्कृतीचे दर्शन रांगोळीतून होते. आपली छोटी मदत गरजवंताला गरजेला खूपच मोठी असते. कदाचित एखाद्याचं जीवन त्यातून घडू शकते असं “गरज “या लेखात त्या लिहितात. शोध बलस्थानांचा या लेखातील त्यांचे विचार मनाला पटतात पालकानी मुलांना त्यांच्या कलेने पुढे जाऊ द्यावे म्हणतात. तरूण पिढी बदलते आहे त्यांना संस्कार नाहीत असं म्हटलं जात असले तरी अजूनही संस्कार आहेत पुढे राहतील हे “संस्कार “लेख वाचून कळते. माहेर, आठवणीतल घर, असे पाहुणे येती, मुक्त मी, निरोप, लाभले आम्हांस भाग्य या सारखे लेख वाचनीय आहेत. आठवण, शाळा, रेडिओ लेख वाचून बालपण आठवते. जडणघडण लेखात त्या लिहितात मुलाना सर्व द्या पण संघर्ष त्यालाच करू द्या, त्यांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे जगू द्या.
लेखिका शिक्षिका प्राध्यापिका आहेत त्यांच्या समोर असणाऱ्या मुलांचे आणि समाजाची मानसिकता यांचे अचूक निरिक्षण त्यांनी लेखनातून टिपलं आहे. मुळात लेखिकेचा स्वभाव हा लहानथोर व्यक्ति आणि समाजात मिळून मिसळून वागण्याचा, काहीतरी शिकण्याचा र्लेखनात वेगळेपण जपण्याचा जाणवतो. खरा शिक्षक आणि लेखक हा समाजात डोळसपणे पाहतो लिहितो त्यातूनच तो दिशा देण्याच काम करतो. आपल्या समोर आजुबाजुला आणि समाजात काय दिसतंय, घडतय याचं नीट निरिक्षण केले तरी असंख्य विषय आहेत. लेखिकेने निरिक्षणमधून अभ्यासपूर्ण लिहिण्याच धाडस केले आहे. अनेक वर्तमानपत्र मधून त्यांचे लेखन प्रकाशित झाले असून चांगल्या प्रतिक्रिया मधुनच पुस्तक निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. नव काही वाचण्यालिहिण्याची त्यांना गोडी आहे. पती सासू सासरे जावा ,भाऊ, साहित्यिक मित्र परिवार यांच त्यांना प्रोत्साहन मिळत गेले .एस एस सी डी एड़ असून पुढील शैक्षणिक पात्रता वाढवून त्या प्राध्यापिका होतात कला साहित्य लेखन छंद जोपासतात हे त्यांचे यश कौतुकास्पद आहे. हे पुस्तक विद्यार्थी पालक शिक्षक आणि समाजाने आवर्जून वाचावे. आपल्याला भावी पिढी यशवंत, कीर्तीवंत आणि संस्कारक्षम घडवायची असेल तर जे योग्य समाजहिताचे ,परिवर्तनवादी सुसंवाद आणि संस्कृती जपणार असेल ते स्वीकारून अज्ञान अंधश्रद्धा यांचा पुरस्कार करणारे विचार सोडून, संस्कृती टिकविण्याकरिता “ओघळलेले मोती “वाचावयास हवे त्यावर सकारात्मक विचार करून समाजहित जपून समाज एकसंध ठेवून राष्ट्राचा विकास घडवू या हीच आकांक्षा. वाचक समीक्षक पत्रकार संपादक समाज या पुस्तकाची योग्य दखल घेतीलच प्रा. मनाली बावधनकर मॅडम यांच मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन त्यांच्या पुढील लेखन कार्यासाठी शुभेच्छा.!
जेष्ठ साहित्यिक
राष्ट्रपाल भा सावंत
9403144356