प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल; ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
गुहागर : आरजीपीपीएल कंपनीतून अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक झऱ्यामध्ये येणारे पाणी पिण्यास अयोग्य आणि पूर्ण प्रदूषित असून यामध्ये क्षारयुक्त असे अनेक अनावश्यक घटक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूण आणि Food Hygiene & Health Laboratory Pune हा या संस्थेने दिलेल्या अहवालांमध्ये निष्पन्न झाले आहे. हे प्रदूषित पाणी वापरल्यास येथील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन साथीचे, घशाचे अन्य आजार होऊ शकतात असे म्हटले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
According to the report of the Pollution Control Board, Chiplun and Food Hygiene & Health Laboratory, Pune, the water coming from the natural spring at Anjanvel Brahmanwadi from RGPPL Company is unfit for drinking and completely polluted. It is said that if this polluted water is used, it can endanger the health of the villagers and lead to epidemics and other sore throats. Therefore, the problem of drinking water has arisen in front of the villagers here.
गुहागर तालुक्यातील अंजनवेल ब्राह्मणवाडी कुलिंग टॉवर येथील नैसर्गिक जलस्त्रोत हे आरजीपीपीएल मधून सोडण्यात झिरपल्यामुळे फेब्रुवारी २०२१ पासून प्रदूषित, क्षारयुक्त झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी आरजीपीपीएल व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण यांच्याकडे केली होती. त्यानंतर कंपनी व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूण यांनी येथील प्रदूषित पाण्याचे नमुने गोळा केले होते. या प्रकाराला अनेक दिवस उलटून तरी ग्रामस्थांच्या पत्राला लेखी उत्तर दिले नाही. पाणी नमुने अहवाल लवकर मिळावेत अशी येथील ग्रामस्थांची वारंवार मागणी होत होती. ब्राम्हणवाडी येथील ग्रामस्थांनी अंजनवेल ग्रामपंचायतीला सदर झऱ्याचे प्रदूषित पाण्याची तपासणी करून करून मिळावी अशी लेखी मागणी केली. यावर ग्रामपंचायत तातडीने एफएचएचएल पुणे या संस्थेकडून प्रदूषित पाणी नमुन्यांचे परीक्षण करून घेतले असता हे पाणी पिण्यास योग्य नाही असा अत्यंत धक्कादायक अहवाल ग्रामस्थांना प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे सदर पाणी क्षारयुक्त, मचूळ आणि पाणी पिण्यास योग्य आहे नाही, असा अहवाल दिला आहे. कंपनी प्रशासन मात्र प्रदूषण आमच्यामुळे झालेच नाही असा दावा करीत आहे. दि. १२ एप्रिल रोजी कंपनीने स्वतःच्या प्रयोगशाळेतील अहवालानुसार अंजनवेल ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दूषित पाणी पिण्यास योग्य आहे. त्यामुळे कंपनीच्या बनावट अहवालाचा एकप्रकारे पर्दाफाश झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.