गुहागर : आजच्या स्पर्धेच्या व जाहिरातीच्या युगात ग्राहकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असलेली पाहावयास मिळते. आपण सर्वच ग्राहक आहोत, ग्राहक हिताचे रक्षण करण्यासाठी ग्राहक चळवळ सर्व समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सौ. स्नेहा जोशी यांनी केले.
In today’s age of competition and advertising, consumer fraud is rampant. We are all consumers, asserting that the consumer movement must reach out to all communities to protect consumer interests National Executive Member of All India Consumer Panchayat Performed by Mrs.Sneha Joshi.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या गुहागर तालुक्याची कार्यकारिणी सभा नुकतीच गुहागर भंडारी भवन सभागृहात पार पडली. या सभेला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. जोशी पुढे म्हणाले की, अखिल भारतीय ग्राहक पंचायत हे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करते. ग्राहकाला समोर ठेवून बाजारपेठ सजवल्या जातात. मात्र, काही वेळा ग्राहकांची फसवणूक होत असते. अशावेळी ग्राहकाने जागरूकता दाखवून सनदशीर मार्गाने स्वतःला न्याय मिळण्यासाठी ग्राहक पंचायतीकडे संपर्क साधावा. 2024 मध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीला 50 वर्षे पूर्ण होतील. ग्राहक पंचायतचे भारत सरकारची अधिकृत संघटना आहे. त्याची ताकद व व्याप्तीही मोठी आहे. मात्र ग्राहकाने आपल्यावर अन्याय झाल्यास जागृकतेने तो सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्याकरता ग्राहक पंचायतीच्या वतीने 15 ते 31 डिसेंबर हा ग्राहक पंधरवडा संपूर्ण भारतात साजरा केला जाणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त ग्राहकांना सहभागी करून घेण्यासाठी सर्व ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जोशी यांनी केले.
या सभेला ग्राहक पंचायतीचे प्रांत सचिव चंद्रकांत झगडे, तालुकाध्यक्ष गणेश धनावडे, जिल्हा सदस्य निलेश गोयथळे, मनोज बावधनकर, संतोष देसाई, सुशीला अवेरे, अभिजीत मयेकर, प्रवीण कणगुटकर, ईश्वरचंद्र हलगरे, संदीप चव्हाण, प्रतीक्षा पाडावे, सोनाली वरंडे, मंदार गोयथळे, समीर पवार, आशीर्वाद पावसकर, सुरेंद्र मर्दा आदींसह अन्य ग्राहक पंचायतीचे सदस्य उपस्थित होते.