• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. भास्करराव जाधव यांचा गुहागरवासियांना दिलासा

by Ganesh Dhanawade
November 20, 2020
in Old News
16 0
0
आ. भास्करराव जाधव यांचा गुहागरवासियांना दिलासा
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कॉपरडॅम करून मोडकाआगरमार्गे १५ दिवसांत वाहतूक सुरू होणार

गुहागर : गुहागर-शृंगारतळी मार्गावरील मोडकाआगर येथील पुलाचे काम सुरू असल्याने प्रामुख्याने गुहागर शहरातील जनतेला मोठा वळसा मारून प्रवास करावा लागत आहे. परंतु, या त्रासातून त्यांची आता लवकरच सुटका होणार आहे. मुख्य पुलाचे काम पूर्ण होण्यास अजून दोन महिने जाणार असले तरी त्या बाजूने कॉपरडॅम करून वाहतूक सुरू करण्याच्या सूचना आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना केली असून त्यांनी ती तात्काळ मान्य केली आहे. त्यामुळे येत्या १५ ते २० दिवसांत हे पर्यायी काम पूर्ण होवून वाहतूक सुरू होवून गुहागरवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मोडकाआगर येथील पूल वाहतुकीस योग्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर साधारण वर्षापूर्वी तो राष्ट्रीय महामार्ग विभागाने वाहतुकीस बंद केला. हा पूल ज्या मार्गावर आहे त्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम त्यावेळी मंजूर झाले होते. परंतु, नागरिकांच्या मनातील शंका-कुशंकांमुळे रस्त्याची संयुक्त मोजणी होण्यास विलंब झाला. परिणामी, पुलाचे कामदेखील वेळेत सुरू होवू शकले नाही. यावर्षी एप्रिल अखेरीस काम सुरू झाले, परंतु लवकर सुरू झालेला पाऊस आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे काम बंद राहिल्याने पुलाचे काम पूर्ण होवू शकले नाही. आता हे काम सुरू झाले आहे, परंतु ते पूर्णत्वास जाण्यास अजून दीड ते दोन महिने लागतील.
हा मार्ग बरेच दिवस बंद राहिल्याने गुहागर शहरातील जनतेला सहन करावा लागत असलेला त्रास लक्षात घेवून आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेतला. याच ठिकाणावरून तात्पुरती व्यवस्था करून दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व अन्य हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करता येईल का, याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यातून मार्गही काढला. त्याप्रमाणे सध्या काम सुरू असलेल्या पुलाच्या बाजूने मातीचा भराव करून कॉपरडॅम तयार करण्याचे निष्चित झाले.
काल (गुरूवारी) शृंगारतळी येथील रस्त्याच्या उंचीबाबत बाजारपेठ व्यापारी संघटनेने केलेल्या मागणीवरून आ. श्री. जाधव यांनी पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात संबंधित सर्व अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली आणि रस्त्यासह इतर सर्वच प्रश्न आणि शंकांचे निरसन करून तोडगा काढला. या बैठकीनंतर त्यांनी मोडकाआगर पुलाच्या कामाची पाहणी केली. त्याचवेळी पर्यायी करण्यात येणाऱ्या कॉपरडॅमच्या कामाचीही माहिती घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सलीम शेख, उपअभियंता श्री. मराठे, प्रभारी प्रांताधिकारी श्री. जयराज सूर्यवंशी, गुहागरच्या तहसीलदार श्रीमती लता धोत्रे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. सचिन बाईत, सभापती विभावरी मुळे, उपसभापती सुनील पवार, जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रवीण ओक, ठेकेदार श्री. शिवाजी माने आदी उपस्थित होते.

Tags: GuhagarGuhagar NewsGuhagar Vijapur National HighwayMarathi NewsNews in Guhagarआमदार भास्करराव जाधवकॉपरडॅमगुहागर तालुका शिवसेनाटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्याराष्ट्रीय महामार्ग विभागलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.