गुहागर : राष्ट्रीय अंध कल्याण संघ(National Blind Welfare Association )(भारत)( India) वरळी-मुंबई यांच्या सौजन्याने गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा येथे मोफत डोळे तपासणी(Eye examination), चष्मे(Spectacles) व मोतीबिंदू शस्त्रक्रिया(Cataract surgery) शिबिराचे शनिवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.


पाचेरी आगर ग्रामपंचायत सदस्य(Gram Panchayat Member), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते(Senior social workers) गजानन रामजी काजरोळकर यांनी या शिबिराचे(Camp) आयोजन केले आहे. राष्ट्रीय अंध कल्याण संघाचे(National Blind Welfare Association ) मानद सचिव सुहास कर्णिक, सदस्य विजय काजरोळकर, उपसंचालक अरविंद नार्वेकर, डॉ. दिनेश जोशी यांचे विशेष सहकार्य या शिबिरासाठी लाभणार आहे. ज्ञानदीप सेवा मंडळ(Dyandeep Seva Mandal) बौद्धवाडी, ग्रामपंचायत पाचेरी सडा (मोंभार) याठिकाणी हे शिबीर पार पडणार असून परिसरातील रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गजानन काजरोळकर यांनी केले आहे.