राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजी जाधव यांचे आवाहन
गुहागर : रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू संपूर्ण रत्नागिरी जिल्हा मध्ये संगणक कौशल्य अभियान सुरू आहे या अभियानाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दि.३० ऑक्टोबर पर्यंत लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव साहेब यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना केले आहे.
या संगणक कौशल्य योजनेचा माध्यमातून आतापर्यंत संपुर्ण रत्नागिरी जिल्हा मध्ये जवळपास सात शाखा मध्ये मिळुन १०० ते १५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून येत्या ५-६ दिवसांत गरजू विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने या संगणक कौशल्य अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. बाबाजीराव जाधव यांनी केले आहे.