• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रेशन दुकानदाराविरोधात तक्रार

by Mayuresh Patnakar
September 4, 2020
in Old News
16 0
0
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नरवणमधील घटना : इंटरनेट आकार दिला नाही तर धान्य नाही

04.09.2020
गुहागर : रेशन दुकानदाराला नेटवर्कचे पैसे दिले नाहीत म्हणून माझ्या वडिलांना धान्य मिळाले नाही. अशी तक्रार नरवणचे ग्रामस्थ अमोल नाटुस्कर यांनी तहसीलदार कार्यालयात केली आहे. शिवाय घटनेचा पुरावा म्हणून वादावादीचे चित्रीकरणाची सीडी देखील अर्जासोबत जोडली आहे.
अमोल नाटुस्कर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, नरवण येथील रेशन दुकानदार वसंत देऊडकर यांनी इंटरनेट कनेक्शनपोटी काही रक्कम अर्जदाराचे वडिल संजय नाटुस्कर यांच्याकडे 27 ऑगस्ट रोजी मागितली. सदरहु रक्कम जोपर्यंत देत नाही तोपर्यंत धान्य मिळणार नाही. असेही रेशन दुकानदाराने सांगितले. ती रक्कम भरण्यासाठी संजय नाटुस्कर  मुलगा अमोलसोबत  रेशन दुकानात आले. रक्कम भरतो मात्र पावती द्या अशी मागणी अमोलने केली. त्यावेळी पावती देण्याचे नाकारुन नाटुस्कर पितापुत्रांना दुकानदाराने शिवीगाळ केली. सदर दुकानदार ग्राहकांकडून पावती पेक्षा जास्त पैसे घेतो. वर्ष भरासाठी लागणाऱ्या रेशन स्लीपचे पैसे ग्राहकांकडून वसुल करतो. त्यामुळे योग्य ती कार्यवाही करावी अशी तक्रार नाटुस्कर यांनी केली आहे.
सदर तक्रारीबाबत तहसीलदारांकडे चौकशी केली असता आपण रजेवर असल्याने यातील काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.