नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचे प्रतिपादन
गुहागर : गुहागर नगरपंचायत गुहागर शहराच्या विकासासाठी माझ्यासह सर्व नगरसेवक नेहमीच कटीबध्द आहोत, असे प्रतिपादन गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केले.
Guhagar Nagar Panchayat’s All the corporators including me are always committed for the development of Guhagar city, This statement was made by Rajesh Bendal, Mayor of Guhagar Nagar Panchayat.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शहरामध्ये एलईडी स्ट्रीट लाईट बसविणे कामाचे उद्घाटन शहरातील गांधी चौक येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात विकासकामे होत आहेत. त्यामध्ये गुहागर शहरामध्ये १४ वा वित्त आयोग सन २०२१-२२ मधून एलईडी लाईट बसविणे या २ कोटी ४ लाखांचे काम सुरु होत आहे. त्यामुळे गुहागर शहर आणखी प्रकाशमय होवून जाणार असल्याचे श्री. बेंडल यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्षा स्नेहा भागडे, बांधकाम सभापती माधव साटले, आरोग्य सभापती अमोल गोयथळे, शिक्षण सभापती उमेश भोसले, नगरसेवक वैशाली मालप, मृणाल गोयथळे, प्रसाद बोले, सुजाता बागकर, प्रणिता साटले, स्नेहल रेवाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
यासंदर्भात गुहागर न्यूजशी बोलताना नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, नगरपंचायतीचा कारभार हाती घेताना पाणी, स्वच्छता आणि सर्व प्रभागांमध्ये प्रकाश व्यवस्था करण्याला आम्ही प्राधान्य देण्याचे निश्चित केले होते. लाईट व्यवस्थेमध्ये परिपूर्णतेकडे नगरपंचायतीची वाटचाल सुरु आहे. बंद असलेले 100 हायमॅक्स दुरुस्त करण्याचे काम आठ दिवसांपूर्वी सुरु झाले आहे. शहरातील 500 सीएफएल बदलून त्या ठिकाणी एलईडी बसविण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 247 एलईडी आणि 5 हायमॅक्स बसविण्याच्या कामाचे उद्घाटन आम्ही केले आहे. शहरातील 17 प्रभागांमध्ये 247 एलईडी लाईट बसविण्यात येणार आहेत. तर 5 हायमॅक्स अत्यावश्यक ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.