• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सामान्य महिलेची कोरोना योद्ध्यांना मदत

by Mayuresh Patnakar
August 29, 2020
in Old News
17 0
2
Shalaka Khare giving apron to docters
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शहरातील डॉक्टरांना दिले ॲप्रनचे सुरक्षा कवच

29.8.2020

गुहागर : कोरोनाच्या संकट काळात गुहागर तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्थेचे सर्वांनीच कौतुक केले. पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन, महसुल प्रशासन यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते, संस्था समोर आल्या. पण नित्यनेमाने तालुकावासीयांच्या आरोग्याची काळजी घेणारे खासगी डॉक्टर या प्रवाहात थोडे किनाऱ्यालाच होते. खरतरं कोरोनाच्या संकटात खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना अनेकवेळा धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. मात्र त्यावरही मात करत रुग्णसेवेचे काम तालुक्यातील डॉक्टर करत होते. त्यांच्याविषयी असलेला आदर व्यक्त करण्याचे काम गुहागर शहरातील एका सामान्य महिलेने केले आहे. दुर्गादेवी देवस्थानमध्ये व्यवस्थापिका म्हणून काम करणाऱ्या श्रीमती शलाका खरे यांनी गुहागर शहरातील डॉक्टरांना आज कॉटनचे ऑपरेशन थिएटरमध्ये वापरले जातात असे ॲप्रन भेट म्हणून दिले.
श्रीमती शलाका खरे दरवर्षी पती कै. चंद्रशेखर रामचंद्र खरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अन्नदान करतात. यावर्षी चार्तुमास असुनही कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे त्यांना अन्नदान करता आले नाही. दरवर्षीचा संकल्प यावर्षी करता येणार नाही म्हणून त्या अस्वस्थ होत्या. काय करावे या विचारचक्रात अडकलेल्या शलाका खरेंना एकदम कल्पना सुचली ती कोरोनाच्या संकटात मदत करण्याची. परंतु मदत कशी करायची हा प्रश्र्न होताच. याबाबत देवस्थानच्या पंचाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी शहरातील डॉक्टरांना ॲप्रेन देण्याचे ठरविले. ‍
याबाबत शलाका खरे म्हणाल्या की,  नेहमी रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या खासगी डॉक्टरांनाही कोरोनाबाबत सावधानता बाळगावी लागते. मात्र प्लास्टीकच्या पीपीई किटमध्ये दहाबारा तास या डॉक्टरांना थांबणे शक्य नाही. आपण तोंडाला मास्क लावल्याने कोरोनाचा संसर्ग टाळता येवू शकतो. मग जर कॉटनचा पूर्ण ॲप्रन डॉक्टरांना दिला तर त्यांना देखील कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करणे सोपे जाईल. हा विचार करुन मी ॲप्रन देण्याचा निर्णय केला.
श्रीमती शलाका खरे यांच्या या विचारांचे दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे व पंच डॉ. आनंद खरे यांनी स्वागत केले. असे ॲप्रन उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था. डॉ. आनंद खरेंनी केली. गुहागर न्युजशी बोलताना डॉ. खरे म्हणाले की, श्रीमती खरे यांनी केलेला विचार व्यवहार्य आहे. शहरातील डॉक्टरांनी देखील या विचारांचे स्वागत केले आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये वापरला जाणारा ॲप्रेन, टोपी आणि मास्क पूर्णपर्ण कॉटनेचे असल्याने कितीवेळ ते परिधान केले तरी त्रास होणार नाही. तसेच या ॲप्रनमुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मदतही होईल.
श्रीमती शलाका खरे यांनी तब्बल दहा हजार रुपये खर्च करुन हे ॲप्रन खरेदी केले.  डॉ. अनिकेत गोळे, डॉ. आनंद खरे यांनी शहरातील सर्व डॉक्टरांना या ॲप्रनचे वाटप केले.  श्रेयस नर्सिंग होमचे डॉ. सुरेश भाले यांनी ॲप्रन वाटपाच्या उपक्रमाबद्दल श्रीमती शलाका खरे यांचे आभार मानले आहेत. डॉ. भाले म्हणाले की, सामान्य माणसांच्या मनात आमच्याबद्दल असलेला आदर यानिमित्ताने व्यक्त झाला आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.