• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा

by Ganesh Dhanawade
August 17, 2021
in Old News
21 0
1
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा
41
SHARES
118
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात असणाऱ्या संपूर्ण आरोग्य सेवेचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. त्यांनी येथील जिल्हा रुग्णालय तसेच नव्याने सुरू झालेल्या महिला रुग्णालयातील सर्व साधन सुविधांची पाहणी करून याबाबत संबंधितांशी चर्चा केली. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे हे त्यांच्या समवेत या भेटीदरम्यान होते.
जिल्ह्यातील कोविड बाबतची स्थिती नियंत्रणात आल्यानंतर दिनांक 15 ऑगस्ट पासून निर्बंधांमुळे सवलतीचा निर्णय झालेला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली, या पार्श्वभूमीवर नव्याने रुग्ण संख्या वाढीचा धोकादेखील शक्य आहे. त्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी महोदयांनी दोन्ही रुग्णालयांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली व उपलब्ध सुविधा औषधांची उपलब्धता आणि व्हेंटिलेटर यंत्रणा तसेच ऑक्सिजन पुरवठा आदींबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
रुग्णालयात अत्यावश्यक असणारे मनुष्यबळ तसेच येणाऱ्या काळात कुठे व किती बेडची संख्या वाढवता येईल याबाबत देखील या भेटीदरम्यान चर्चा करण्यात आली. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांनी भेट दिली. त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी रुग्णालयात असणाऱ्या सद्यस्थितीची पूर्ण माहिती जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांना दिली.
या रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा तसेच ऑक्सिजन साठा व ऑक्सीजन पुरवण्याची पद्धती याबाबत जिल्हाधिकारी महोदयांनी माहिती घेतली. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी पी एम केअर फंडातून प्राप्त व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची तक्रार केली होती याबाबतची वस्तुस्थिती देखील जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी जाणून घेतली.
रुग्णांवर करण्यात येणारी उपचार पद्धती तसेच आवश्यक असणारी औषधी यांची उपलब्धता याबाबत देखील यावेळी आढावा घेण्यात आला. उद्यम नगर भागातील महिला रुग्णालय इमारत सध्या विशेष कोविड रूग्णालय म्हणून कार्यरत आहे. या ठिकाणी बाल रुग्णांसाठी देखील आयसीयूची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबतची पाहणी देखील जिल्हाधिकारी पाटील यांनी केली. रुग्णांना सेवा देताना घ्यावयाची काळजी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना संदर्भात सुरक्षित अंतर तसेच इतर अत्यावश्यक खबरदारी याबाबत देखील चर्चा झाली.
जिल्ह्यात सवलत दिल्यानंतर आता सर्व दुकानांना रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. सोबतच विविध ठिकाणी वाहतुकीत वाढ होणार आहे. तथापि रुग्ण संख्येत वाढ होणार नाही याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून अनेक बाबी आवश्यक आहेत. त्यातील एक बाब म्हणून डॉ. पाटील यांनी या रुग्णालयातील सर्व बाबींचा आढावा घेतला

Tags: CoronaCorona In GuhagarCorona NewsCovid19DistrictDistrict CollectorDistrict Collector Dr. B. N. PatilGuhagarGuhagar Newshealth serviceMarathi NewsNews in Guhagarwave of covidआरोग्य सुविधाकोरोनाकोरोना बातम्याकोविड केअर सेंटरगुहागरातील कोरोनाजिल्हा रुग्णालयजिल्हा शासकीय रुग्णालयजिल्हाधिकारीजिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटीलटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यारुग्णालयलोकल न्युजव्हेंटिलेटर
Share16SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.