जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकुर नेतृत्व करणार
गुहागर : चिपळूणमध्ये आलेल्या प्रचंड महापुरामुळे चिपळूण शहरासह खेर्डी भागातील अनेक कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मानवतेच्या नात्याने त्यांना सर्वच स्तरातून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप होत आहेच. परंतु पुरामुळे घरात व दुकानांमध्ये आलेला गाळ, चिखल काढून साफसफाई करण्यासाठी गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या नेत्रा नवनीत ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली आज 26 जुलै रोजी “एक हात मदतीचा” या माध्यमातून गटातील दीडशेहून असंख्य कार्यकर्ते व नागरिक चिपळूण येथे रवाना झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकुर यांनी पुन्हा एकदा सामाजिक कार्यात आघाडी घेतली आहे.
To remove mud and sludge from houses and shops due to floods Under the leadership of Netra Navneet Thakur, a member of Velneshwar Zilla Parishad group in Guhagar taluka, today on 26th July through “Ek Haat Madaticha” Numerous activists and citizens from the group have left for Chiplun. Zilla Parishad member Netra Thakur has once again taken the lead in social work.
चिपळूणमध्ये उद्भवलेली पूरपरिस्थिती ही 2005 पेक्षाही खूप भयानक आहे. या पुराचा फटका संपूर्ण चिपळूण शहरासह खेर्डी भागाला बसला आहे. घरे, दुकाने, इमारतींमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उद्वस्थ झाले आहेत. दुकानांमध्ये भरलेला माल चिखलाने खराब झाला आहे. घरात पाणी शिरल्याने सर्व साहित्य भिजून खाण्यापाण्याचे हाल होत आहेत. अशा मोठ्या संकटात सापडलेल्या पूरग्रस्त पुरानंतर रोज दिवसभर घर व दुकानात साठलेला चिखल व कचरा काढताना दिसत आहेत. या परिस्थितीची दाखल जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकुर यांनी घेतली. पूरग्रस्तांचा हा विषय आपल्या जिल्हा परिषद गटात सांगून चिपळूण येथे जाऊन श्रमदान करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला गटातील कार्यकर्ते व नागरिकांनी प्रतिसाद देत आज सोमवारी सकाळी सुमारे दीडशे जण स्वच्छतेसाठी आवश्यक असलेली अवजारे घेवून चिपळूण कडे रवाना झाले आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांनी कोरोना काळातही आपल्या जिल्हा परिषद गटात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या भागात नागरिकांशी राजकारणापलीकडे जाऊन आपले नाते निर्माण केले आहेत. प्रत्येकाच्या सुख दुःखात धाऊन जाणाऱ्या सदस्या म्हणून संपूर्ण तालुक्यात ओळखल्या जातात. श्रमदानासाठी गुहागर पंचायत समितीचे उपसभापती सीताराम ठोंबरे, सदस्या पूनम पाष्ठे व अनेक सरपंच, उपसरपंच सहभागी झाले आहेत.