गुहागर : महाराष्ट्र छत्रपती युवा सेना जिल्हाप्रमुखपदी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सामाजिक कार्यकर्ते रियाज हुसैन ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबतचे पत्र छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांच्या आदेशानुसार त्यांना देण्यात आलेले आहे.
या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, 18 पगडजाती, 12 बलुतेदार, 6 आलुतेदार यांना एका छत्राखाली आणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेले कार्य आपल्या हातून घडो. जनतेच्या न्याय व हक्कांसाठी संघटनेचे ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य आपल्या हातून घडो. गाव तिथे शाखा, शाखा तिथे कार्यकर्ता जोडण्याचे काम आपल्या हातून होवो.
संघटनेच्या अपेक्षांप्रमाणे आपल्याकडून कार्य घडेल अशा शुभेच्छा हे नियुक्तीपत्र प्रदान करताना राज्य समन्वयक पुष्पा जगताप यांनी रियाज ठाकूर यांना दिल्या. ठाकूर यांच्या नियुक्तीबाबत गुहागर तालुकावासीयांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.