जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकुर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गुहागर : संपूर्ण कोकणातील व गुहागर तालुक्यातील मुंबई, पुणे व इतर शहरातील चाकरमान्यांची आरटीपीसीआर किंवा अँटिजेन टेस्ट न करता त्यांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येण्यास परवानगी देण्यात यावी, अशी आग्रहाचे मागणी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य नेत्रा ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
In a statement to Chief Minister Uddhav Thackeray, Zilla Parishad group member Netra Thakur demanded that Chakarmanis from Mumbai, Pune and other cities in the entire Konkan and Guhagar talukas should be allowed to come to their village for Ganeshotsav without RTPCR or antigen test.
या निवेदनात म्हटले आहे की, नोकरी धंद्यानिमित्त मुंबई, पुणे व इतर शहरातील चाकरमान्यांना दरवर्षी गणेशोत्सवाच्या उत्सवासाठी त्यांच्या कोकणातील मूळ गावी येत असतात. त्यासाठी कोकणातील चाकरमानी येण्यासाठी एस.टी., रेल्वे व खाजगी वाहनांचे बुकिंग आधीच करून ठेवलेले आहे. परंतु चाकरमानी ग्रामस्थांना गणेशोत्सवासाठी गावी येण्यास शासकीय आदेशानुसार आर.टी.पी.सी.आर. चाचणी केलेली व कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तीनांचा कोकणात प्रवेश देण्याचे निर्देश दिलेले आहेत. परंतु सद्यस्थितीत आमच्या व अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंचानी आमच्याशी लोकप्रतिनिधी म्हणून साधलेल्या संपर्कानुसार व आम्ही घेतलेल्या आढाव्यानुसार शहरातील बहुसंख्य कोकणातील ग्रामस्थांना अजूनही बुकिंग करूनही डोस उपलब्ध झालेले नाहीत. ज्यांना पहिला डोस मिळालेला आहे, त्यांना दुसरा डोस साठी कोवॅक्सिन व कॉविशील्ड या लसींच्या डोससाठी अनुक्रमे ३० दिवस व ८४ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. आमच्या गुहागर तालुक्यात व संपूर्ण कोकणातील मुंबई, पुणे व इतर शहरातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी मूळ गावी येण्यासाठी आपल्या शासनाच्या आदेशातील आर.टी.पी.सी.आर.चाचणी व कोरोना लसीचे दोन डोस या नमूद अटी शिथिल करून प्रवेश देण्यात यावा. त्यासाठी प्रत्येक गावचे सरपंच व ग्रामकृतीदले जबाबदारी घेण्यास तयार आहेत. तरी आपण नमूद केल्या प्रमाणे नियमात शिथिलता व्हावी यासाठी शासनस्तरावरून कार्यवाही व्हावी, अशी मागणी नेत्रा ठाकूर यांनी मुखमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, नेत्रा ठाकूर यांनी याआधीही कोकण किनारपट्टी वरील मच्छिमारांना लस उपलब्ध व्हावी यासाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या मागणीमुळे बहुतांशी मच्छिमारांचे लसीकरण झाले. तर कमी लस पुरवठ्यामुळे काही मच्छिमारांचे लसीकरण राहिले आहे. ते देखील पूर्ण करण्यासाठी ठाकूर यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.