गुहागर : गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने आमदार श्री.भास्करशेठ जाधव आणि जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात तसेच रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानाचा निषेध करण्यासाठी शृंगारतळी बाजारपेठेत निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
भाजप प्रणित केंद्र शासनाने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या कृषी विधेयकाचा सर्वाधिक फटका देशातील शेतकऱ्यांना भविष्यात बसणार आहे. नामवंत कंपन्यांचं, उद्योगांचे भले करण्यासाठी केंद्राने कृषी विधेयक मंजूर केले आहे. या विरोधात देशातील शेतकऱ्यांनी नवी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांना राष्ट्रद्रोही म्हणणाऱ्या नामदार दानवे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. तसेच पेट्रोल – डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यात भाजपप्रणीत केंद्र शासनाला पूर्णतः अपयश आले आहे. शिवसेनेच्या वतीने केंद्र शासनाचा निषेधहि यावेळी करण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख सचिनदादा बाईत,क्षेत्रप्रमुख बाळा खेतले, उपतालुकप्रमुख नारायण गुरव,उपतालुकाप्रमुख बाबू सावंत,उपसभापती सुनील पवार,विनायक मुळे,शहरप्रमुख नरेश पवार,सरपंच संजय पवार, शहरप्रमुख निलेश मोरे, युवासेना तालुकाअधिकारी अमरदीप परचुरे,उपतालुका अधिकारी उमेश खैर,उपविभाग प्रमुख अंकुश शिगवण व शिवसैनिक उपस्थित होते.