अडूर विद्यालयाच्या बोधचिन्हाचे केले अनावरण
गुहागर : आचार्य विनोबा भावे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त, गुहागर तालुक्यातील अडूर माध्यमिक विद्यालयाच्या नूतन बोधचिन्हाचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कापले व माजी संस्थापक अध्यक्ष मुरलीधर नार्वेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
On the occasion of the Centenary Silver Jubilee of Acharya Vinoba Bhave, the unveiling of the new logo of Adur Secondary School in Guhagar taluka was graced by President of the Society Pandurang Kapale, and Former Founder President, Murlidhar Narvekar.


यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, आचार्य विनोबा भावे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. नंदकुमार यशवंत जाधव यांच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले शाळेतील इतर सर्वच विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी मोफत मास्क नंदकुमार जाधव यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक ए.के.चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून संपन्न झालेल्या या सोहळ्याप्रसंगी माजी अध्यक्ष प्रभाकर झगडे, अडूर सरपंच शैलजा गुरव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अवंतिका नार्वेकर, माजी सैनिक यशवंत जाधव, कोंडकारुळ उपसरपंच अशोक अडूरकर, संतोष विचारे, प्रकाश कारेकर सचिव भिकाजी गुरव, प्रभात रांजाणे तसेच इयत्ता दहावीच्या सन १९९३-९४ बॅचचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनीच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश सावंत यांनी तर आभार प्रदर्शन आर. के. माने यांनी केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.