गुहागर न्यूज आणि शिवतेज फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी व्हा
आपल्या सर्वांना माहिती आहेच निसर्ग वादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत केले. कित्येकांचे घरसंसार उध्वस्त झाले. बागा भुईसपाट झाल्या. कोरोना पाठोपाठ आलेल्या या संकटामधील हानीतून मानसिकदृष्ट्या सावरायला पाच महिने पुरेसे नाहीत. या पार्श्र्वभुमीवर दिवाळीसारखा मोठा सण येत आहे.या सणाला आपण दिपोत्सव साजरा करणार, नवनविन वस्तुंची खरेदी करणार, फराळ खाणार. पण दापोली आणि मंडणगड तालुक्यातील सर्वांनाच हा आनंद साजरा करता येईल का असा प्रश्र्न आहे. आपल्या जिल्ह्यातील अशा कुटुंबांच्या घरात आपल्याला जर आनंद वाटता आला तर…..असा विचार करुन आम्ही एक उपक्रम करायचा ठरवले आहे. दापोली तालुक्यातील दोन वनवासी पाड्यांवर (आदिवासी) प्रत्येक कुटुंबाला (एकूण 100 कुटुंबांना) फराळ देण्याचा विचार आम्ही करतोय.
गुहागरमधील शिवतेज फाऊंडेशन गेली काही वर्ष गड किल्ले जनजागृती, किनारे स्वच्छता अशा उपक्रमांबरोबरच दिवाळीमध्ये एक दिवा शहिदांसाठी असाही उपक्रम करते. ही संस्था आणि गुहागर न्युजने सामाजिक बांधिलकीतून हा विषय हाती घेतला आहे.
जो फराळ आपल्या घरात आपण करणार/आणणार त्यामध्ये चारजणांच्या कुटुंबाला एकवेळ पुरेल (साधारणपणे ( हा नियम नाही) ५/६ चकल्या, करंज्या, ८/१० कडबोळी, बोरं, चिवडा आदी) असा फराळचा डबा आपण त्यांना देणार आहोत.
ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी 6 नोव्हेंबरपर्यंत खालील व्हॉटसॲप क्रमांकावर सहमती द्यावी.
मयूरेश पाटणकर : 9423048230 (व्हॉटसॲप)
गणेश धनावडे : 9421187522 (व्हॉटसॲप)
मनोज बावधनकर : 9011535300 (व्हॉटसॲप)
अधिक माहितीसाठी वरील फोनवर संपर्क करावा. तसेच स्वखर्चाने जे फराळ वाटपासाठी येवू इच्छितात त्यांनीही आपली सहमती वरील क्रमांकांवर द्यावी ही विनंती.
आपले नम्र
ॲड. संकेत साळवी मनोज बावधनकर मयुरेश पाटणकर गणेश धनावडे
विनम्र सूचना : फराळ वाटपाच्या दापोली तालुक्यातील दोन वनवासी पाड्यांची निश्चिती झालेली आहे. तरी कृपया आपण अन्य गावे, कुटुंब सुचवू नयेत. नियोजनात गडबड होते म्हणून ही सूचना.