• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्टतर्फे मिनी मॅरेथॉन संपन्न

by Ganesh Dhanawade
December 10, 2021
in Guhagar
16 0
0
रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्टतर्फे मिनी मॅरेथॉन संपन्न
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील भारतातील सर्वात मोठ्या एकीकृत ऊर्जा संकुल असलेल्या रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्टच्या वतीने नेहमीच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ तसेच कर्मचारी वर्ग यांच्यासाठी विविध शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. याच अनुषंगाने लोकांपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पोहचवावे, आपला परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचे आव्हान करावे हे उद्देश समोर ठेऊन रविवार प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री असीम कुमार सामंता यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार श्रीम. प्रतिभा वराळे, गुहागर पोलीस स्टेशनचे निरीक्षक, रानवी ग्रामपंचायतचे सदस्य, सीआईएसएफचे अधिकारी याच्या सहकार्याने आरजीपीपीएलच्या मैत्री क्लबच्या नियोजनाखाली मिनी मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

प्रकल्पाच्या निवासी कॉलनी पासून मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली. गुहागर समुद्रकिनारी समारोप करण्यात आला. या मिनी मॅरेथॉनमध्ये २५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री असीम कुमार सामंता व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यावेळी श्री असीम कुमार सामंता यांनी गुहागर चौपाटीच्या आजूबाजूच्या दुकानदारांना सुका व ओला कचरा वेगळा करण्यासाठी मोठ्या आकाराच्या कचऱ्याच्या २५ डब्यांचे वाटप केले.
यावेळी बोलताना श्री. सामंता यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत प्लास्टिक पासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून अवगत केले. तसेच स्वच्छ, सुंदर व हरित असलेला आपला गुहागर समुद्रकिनारा प्लास्टिक मुक्त ठेवण्याचे आव्हान केले.

Tags: cleanlinesseducationalenergy complexFriendship ClubGuhagarGuhagar NewsMarathi NewsMini marathon competitionsNews in GuhagarPeopleplasticRatnagiri Gas and Power ProjectRgpplsocial activitiesआरजीपीपीएलऊर्जा संकुलगॅस आणि पॉवर प्रोजेक्टटॉप न्युजतहसीलदारताज्या बातम्याप्लास्टिकमराठी बातम्यामिनी मॅरेथॉनमुख्य कार्यकारी अधिकारीमैत्री क्लबरत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रा. लि. कंपनीलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.