गुहागर, ता. 08 : संजना महिला समितीच्या योगदानातून आयआयटीजवळ बसथांबा बांधण्यात आला आहे. या बसथांब्यासाठीचा खर्च आरजीपीपीएल निवासी संकुलात रहाणाऱ्या संजना महिला समितीने आपल्या भिशीतून केला आहे. Bus stop built By Sanjana Mahila Samiti
नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनच्या (NTPC) प्रत्येक प्रकल्पामध्ये महिलांचे संघटन आहे. त्या त्या प्रकल्पाच्या निवासी वसाहतीमध्ये असलेल्या पुरूष अधिकारी, कर्मचारीच्या पत्नी तसेच प्रकल्पात काम करणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचारी महिला समितीच्या सदस्या असतात. निवासी वसाहतीमध्ये या महिला समितीतर्फे मुलांसाठी मेळावे, स्नेहसंमेलन, खाद्यपदार्थ स्पर्धा आदी उपक्रम घेतले जातात. वर्षातून एकदा एक मोठी जत्राही भरवली जाते. Bus stop built By Sanjana Mahila Samiti
गुहागर (Guhagar) तालुक्यातील आरजीपीपीएलमध्ये देखील संजना महिला समिती (Sanjana Mahila Samiti) हे महिलांचे संघटन आहे. या संस्थेमार्फत विविध कार्यक्रम होत असतात. या समितीमधील काही महिला सदस्यांच्या लक्षात आले की, रानवी येथील आयटीआयजवळ शासनाने बांधलेला बसथांबा पुरेसा नाही. या बसथांब्यासमोर आणखी एका बसथांब्याची आवश्यकता आहे. हा बसथांबा आपण बांधावा अशी कल्पना समोर आली. Bus stop built By Sanjana Mahila Samiti आरजीपीपीएलचे (RGPPL) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असीमकुमार सामंता यांच्याकडे बसथांब्याचा प्रस्ताव संजना महिला समितीने दिला. या प्रस्तावमध्ये जमीनी उपलब्धता, अन्य तांत्रिक गोष्टी व प्रत्यक्ष बसथांब्याच्या उभारणीसाठी कंपनीने सहकार्य करावे. आर्थिक मदत (Financial Contribution) महिला सदस्या करतील. असे नमुद करण्यात आले होते. त्याप्रमाणे बसथांब्यासाठी येणारा खर्च महिला सदस्यांनी वर्गणी द्वारे गोळा केला. आरजीपीपीएल मधील विविध विभागांमार्फत बसथांबा बांधण्याचे काम पूर्ण झाले. कोरोनाचे निर्बंध असल्याने छोटासा कार्यक्रम घेवून संजना महिला समितीने या बसथांब्याचे उद्घाटन केले. Bus stop built By Sanjana Mahila Samiti