• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बँकांना गंडवणाऱ्या विजय माल्याला दणका

by Ganesh Dhanawade
June 19, 2021
in Old News
16 1
0
बँकांना गंडवणाऱ्या विजय माल्याला दणका
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

६२०० कोटींचे शेअर्स विकून होणार कर्ज वसूली

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयच्या नेतृत्वाखाली देशातील बँकाचा एक गट आर्थिक फसवणूक करुन पळून गेलेल्या विजय माल्याच्या तीन कंपन्यांमधील शेअर होल्डिंग विकून किंगफिशर विमान कंपनीला दिलेले ६२०० कोटींपेक्षा अधिक कर्जाची वसुली करणार आहे. यूनायटेड ब्रुवरीज लिमिटेड, यूनायटेड स्पिरिट्स लिमेटेड आणि मॅकडॉवेल होल्डिंग्स लिमिटेडमधील माल्या यांच्या वाट्याचे शेअर्स ब्लॉक डील्समध्ये २३ जून रोजी विकले जातील. माल्या यांच्या मालकीची किंगफिशर एअरलाइन्स ही कंपनी ऑक्टोबर २०१२ पासून बंद आहे.
माल्याला २०१९ मध्ये कर्ज बुडवल्याप्रकरणी आणि बँकाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी देशातून पळून गेलेला गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. सध्या माल्या ब्रिटनमधील न्यायालयांमध्ये त्याला भारताच्या ताब्यात देण्याची जी मागणी केली जातेय त्याविरोधात खटला लढत आहे. जर खरोखरच माल्याच्या मालकीच्या शेअर्सची विक्री झाली तर बँकाकडून किंगफिशर एअरवेज कर्ज प्रकरणामध्ये विजय माल्याविरोधातील पहिली मोठी वसुली असेल. किंगफिशरला देण्यात आलेलं कर्ज हे २०१२ च्या शेवटी नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. माल्याने मार्च २०१६ मध्ये भारत सोडला. १७ बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
मनी कंट्रोलने काही कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार या शेअर्सची विक्री बंगळुरुमधील डेट रिकव्हरी ट्रेब्युनल म्हणजेच डीआरटीच्या देखरेखीखाली होईल. या कंपनीकडे माल्याने घेतलेल्या ६२०३ कोटी रुपयांच्या कर्जवसुलीची जबाबदारी देण्यात आलीय. ही विक्री पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे. जर ब्लॉक डीलमध्ये या शेअर्सची विक्री झाली नाही तर बँक बल्क किंवा रिटेल माध्यमातून शेअर्सची विक्री करु शकते. किंगफिशरला कर्ज देणाऱ्या बँकांच्या यादीमध्ये एसबीआयबरोबरच पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, इलाहाबाद बँक, फेडरल बँक आणि अ‍ॅक्सेस बँकेचा समावेश आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarअ‍ॅक्सेस बँकआयडीबीआय बँकइलाहाबाद बँकएसबीआयकिंगफिशरकिंगफिशर एअरलाइन्सकिंगफिशर विमान कंपनीटॉप न्युजडीआरटीडेट रिकव्हरी ट्रेब्युनलताज्या बातम्यापंजाब नॅशनल बँकफेडरल बँकबँक ऑफ बडोदामनी कंट्रोलमराठी बातम्यामॅकडॉवेल होल्डिंग्स लिमिटेडयूनायटेड ब्रुवरीज लिमिटेडयूनायटेड स्पिरिट्स लिमेटेडलोकल न्युजविजय माल्यास्टेट बँक ऑफ इंडिया
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.